ETV Bharat / sports

T20 World Cup, NAM vs SCO : नामिबियाचा ऐतिहासिक विजय, स्कॉटलंडला नमवलं - Scotland challenge Namibia for 110 in 20 overs

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच Super 12मध्ये प्रवेश करणाऱ्या नामिबियानं बुधवारी ऐतिहासिक विजय मिळवला. नामिबियाने तगडा प्रतिस्पर्धी स्कॉटलंडचा पराभव केला. या विजयासह नामिबियाने ग्रुप 2 मध्ये २ गुणांची कमाई करताना .५५० नेट रनरेटसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

टी 20 विश्वचषक 2021
टी 20 विश्वचषक 2021
author img

By

Published : Oct 27, 2021, 10:11 PM IST

Updated : Oct 28, 2021, 12:26 AM IST

दुबई - टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच Super 12मध्ये प्रवेश करणाऱ्या नामिबियानं बुधवारी ऐतिहासिक विजय मिळवला. नामिबियाने तगडा प्रतिस्पर्धी स्कॉटलंडचा पराभव केला. या विजयासह नामिबियाने ग्रुप 2 मध्ये २ गुणांची कमाई करताना .५५० नेट रनरेटसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. टीम इंडिया, न्यूझीलंड आणि स्कॉटलंड यांची पाटी अजून कोरीच आहे. स्कॉटलंडचा हा सलग दुसरा पराभव ठरल्याने त्यांचे उंपात्य फेरीतील आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे.

रुबेन ट्रंपलमॅनचा इतिहास -

टी २० वर्ल्डकपमध्ये प्रत्येक सामन्यात एका नव्या विक्रमाची नोंद होत आहे. आता नामिबियाच्या गोलंदाजाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. स्कॉटलँडविरुद्धच्या सामन्यात नामिबियाचा वेगवान गोलंदाज रुबेन ट्रंपलमॅनने इतिहास रचत पहिल्या षटकात ३ गडी बाद करत टी २० वर्ल्डकपमध्ये विक्रमाची नोंद केली आहे. नामिबियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात तीन धक्के देत स्कॉटलँडवर दबाव आणला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या स्कॉटलंडचे तीन फलंदाज पहिल्याच षटकात माघारी परतले. नामिबियाचा जलदगती गोलंदाज रुबेन ट्रम्पलमॅननं पहिल्याच चेंडूवर जॉर्ज मुन्सीचा शुन्यावर त्रिफळा उडवला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर कॅलम मॅकलीओडलाही खातेही उघडू न देता यष्टिरक्षकाच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. पुढच्याच चेंडूवर रिची बेरींगटन ही ही भोपळाही न फोडता तंबूत परतला. पुरुष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या षटकात तीन विकेटस् घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला. या धक्क्यांतून सावरताना स्कॉटलंडनं मिचेल लिस्क ( ४४) व ख्रिस ग्रेव्हेस ( २५) यांच्या भागीदारीच्या जोरावर ८ बाद १०९ धावांपर्यंत मजल मारली. लिस्कने २७ चेंडूत ४ चौकार व २ षटकार खेचले होते. नामिबियाकडून रुबेननं १७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्याला जॅन फ्रायलिंक ( २-१०), जेजे स्मिथ ( १-२०) व डेव्हिड विज ( १-२२) यांची उत्तम साथ मिळाली

प्रत्युत्तरात क्रेग विलियम्स व मिचेल व्हॅन लिंगेन यांनी नामिबियाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण, शाफियान शरिफनं लिंगेनला १८ धावांवर बाद केले. झेन ग्रीन ( ९) व कर्णधार गेरहार्ड इरास्मस ( ४) हे झटपट माघारी परतल्यानं नामिबियाची अवस्था बिकट झाली होती. विलियम्सन २३ धावांवर माघारी गेल्यानंतर त्यांचा पाय आणखी खोलात गेला. मात्र, डेव्हिड विज व जेजे स्मिथ यांनी झुंझार खेळ करत सामना जिवंत ठेवला. विज १६ धावांवर बाद झाला, परंतु स्मिथनं नाबाद ३२ धावा करून नामिबियाला ४ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. स्मिथने खणखणीत षटकार ठोकून विजय मिळवला.

हेही वाचा - टी 20 विश्वचषक सामना : 8 गडी राखून इंग्लंडचा बांग्लादेशवर दणदणीत विजय

Last Updated : Oct 28, 2021, 12:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.