चंडीगढ - टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी कुमार दहिया इतिहास रचण्यात अपयशी ठरला. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. हरियाणा सरकारने या कामगिरीनंतर त्याच्यावर बक्षिसाचा वर्षाव केला आहे. यात रवी दहियाला क्लास वन कॅटेगरीतील नौकरी, हरियाणात जिथे पाहिजे तिथे एक प्लाट यासोबत त्याच्या गावात एक इंडोर स्टेडियमसह रोख एक करोड रुपयांचे बक्षिस जाहीर केलं आहे.
रवी कुमार दहिया ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारा दुसरा भारतीय कुस्तीपटू ठरला. तो ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठला दुसरा भारतीय कुस्तीपटू आहे. याआधी सुशील कुमार याने 2012 ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठली होती. पण त्याला अंतिम सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता. यात त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
रवी कुमार दहिया ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा भारताचा पाचवा कुस्तीपटू ठरला. त्याने खाशाबा जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांच्यानंतर ऑलिम्पिक पदक जिंकलं.
रवी कुमार दहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बक्षिसाची घोषणा केली. यात त्यांनी रवी कुमार दहियाचे गाव नाहरी येथे आधुनिक सुविधांयुक्त इंडोर कुस्ती स्टेडियम बनवलं जाणार, असल्याचं सांगितलं. तर केंद्र सरकारच्या नियमानुसार, रवी दहियाला 50 लाख रुपये मिळणार आहेत.
हेही वाचा - मर्डर प्रकरणातील संशयित आरोपी कुस्तीपटू सुशील कुमार कारागृहातील कर्मचाऱ्यांना देतोय हेल्थ टिप्स
हेही वाचा - Tokyo Olympics : अमेरिका टोकियोत 100 पदके जिंकणारा ठरला पहिला देश