ETV Bharat / sports

अभिमानास्पद..! बीडचा भूमिपुत्र कुस्तीपटू राहुल आवारे यास 'अर्जुन पुरस्कार' जाहीर - अर्जुन पुरस्कार २०२० विजेते

राहुल आवारे याचे बीड जिल्ह्यातील पाटोदा हे मूळ गाव असून येथील भामेश्वर विद्यालयात त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. भारत सरकारकडून देण्यात येणारा अर्जुन पुरस्कार बीडच्या राहुल आवारे याला जाहीर झाला असून बीडकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

wrestler rahul avare
राहुल आवारे
author img

By

Published : Aug 19, 2020, 12:40 AM IST

बीड - महाराष्ट्राचा लाडका मल्ल व राष्ट्रकूल सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू राहुल बाळासाहेब आवारे याला केंद्र सरकारचा क्रीडा क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा 'अर्जुन ' पुरस्कार जाहीर झाला आहे. गतवर्षी गुण पूर्ण असुनही राहुल या सन्मानापासून वंचित होता. यावर्षी मात्र राहुलच्या १५ वर्षाच्या कारकिर्दीला न्याय मिळाला आहे.

राहुल आवारे याचे बीड जिल्ह्यातील पाटोदा हे मूळ गाव असून येथील भामेश्वर विद्यालयात त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. भारत सरकारकडून देण्यात येणारा अर्जुन पुरस्कार बीडच्या राहुल आवारे याला जाहीर झाला असून बीडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. तो मागील १५ वर्षे कुस्ती क्षेत्रात गरुडभरारी मारत राहिला. राष्ट्रकूलसारख्या जागतिक कुस्ती स्पर्धेत त्याने यश मिळवलेले आहे.

राहुल हे सध्या नाशिक येथे डी.वाय.एस.पी.चे प्रशिक्षण घेत आहेत. यावर्षी राहुल आवारे याला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने बीडकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही तमाम महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. राहुल यांच्या यशाबद्दल त्याच्यावर महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राहुल याने रुस्तुम- ए- हिंद हरिश्चंद्र बिराजदार व काकासाहेब पवार यांच्याकडून कुस्ती प्रशिक्षण घेतलेले आहे. कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांकडून आणि त्याच्या चाहत्यांकडून राहुलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.