कझाकिस्तान - विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेला नूर सुल्तान येथे सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. चॅम्पियनशिपच्या पहिल्याच दिवशी ग्रीको-रोमन स्पर्धेतील चार सामन्यात भारताचा पराभव झाला.
हेही वाचा - 'तिरंग्या'ची शान वाढवणाऱ्या महिलांचा सन्मान, 'पद्म'साठी ९ महिला खेळाडूंची शिफारस
हरप्रीत सिंह (८२ किलो), सागर (६३ किलो) आणि मनजीत (५५ किलो) यांना सामन्यांत एकही गुण मिळवता आला नाही. केवळ योगेश (७२ किलो) याने अमेरिकन प्रतिस्पर्धी रेमंड अॅथोनी बंकरला आव्हान दिले. मात्र, त्याचाही अखेर ५-६ असा पराभव झाला.
हेही वाचा - विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : कुस्तीच्या कुंभमेळ्याला आजपासून प्रारंभ
आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारा हरप्रीतचा झेक प्रजासत्ताकच्या पेट्र नोवाक याने ५-० ने पराभव केला. सागरचा सामना अल्मत केबिसपेयेव याच्याविरुध्द होता. या सामन्यात सागरला एकही गुण घेत आले नाही आणि त्याला ०-९ ने पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे, प्री क्वार्टर फायनलमध्ये मनजितचा प्रतिस्पर्धी खूप मजबूत होता आणि त्याने पुनरागमन करण्याचा जोरदार प्रयत्न केला परंतु तांत्रिक श्रेष्ठतेमुळे त्याचा पराभव झाला.