अलमाटी (कझाकिस्तान) - भारताचा स्टार कुस्तीपटू दीपक पुनियाला अशियाई कुस्ती चॅम्पियनशीमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात त्याला पराभवाचा धक्का बसला.
दीपक पुनिया आणि ईराणचा कुस्तीपटू हसन याजदानिचराती यांच्यात अंतिम सामना झाला. हा सामना हसनने १०-० असा एकतर्फा जिंकला. दुसरीकडे भारताचा दुसरा कुस्तीपटू संजीतने ९२ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली. संजीतने उबेकिस्तानचा कुस्तीपटू रूस्तम शोडिएवचा पराभव करत कांस्य पदक जिंकले.
भारतीय संघाने आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत एकूण ७ पदकं जिंकली. भारत फ्री स्टाईल प्रकारात ईराणनंतर दुसऱ्या स्थानावर राहिला.
हेही वाचा - आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप - विनेश, अंशू, दिव्याची सुवर्ण कमाई
हेही वाचा - विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभागी झालेल्या २ भारतीय तलवारबाजांना कोरोनाची लागण