उलान-उदे (रशिया) - भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने गुरुवारी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठत भारतासाठी एक पदक निश्चित केले. मेरी कोम पाठोपाठ भारताची दुसरी बॉक्सर मंजू राणीनेही ४८ किलो वजनी गटातून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. जमुना बोरोने (५४ किलो) आणि लोवलिना बोरगोहॅन (६९ किलो) यांनीही उपांत्य फेरी गाठली आहे.
आज गुरुवारी झालेल्या सामन्यात मेरी कोमने कोलंबियाच्या एंग्रीट वेलन्सियाचा ५-० ने पराभव केला. त्यानंतर मंजू राणीने ४८ किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या कोरियाच्या किम हेयांग मीला ४-१ ने धूळ चारली. मंजू राणीच्या या कामगिरीमुळे भारताचे दुसरे पदक निश्चित झाले आहे.
दरम्यान, मेरी कोमच्या विजयानंतर ८१ किलो वजनी गटात झालेल्या सामन्यात भारताच्या कविता चहलचा पराभव झाला. बेलारुच्या खेळाडूने कविताला ४-१ असा पराभव करत तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.
हेही वाचा - जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : मेरी कोमने रचला विक्रम, भारताचे पदक पक्के
हेही वाचा - डोपिंग प्रकरणी निर्मला शेरॉनवर ४ वर्षांची बंदी, भारतावर सुवर्णदपक गमावण्याची नामुष्की