दोहा - कतार येथे सुरू असलेल्या ६ व्या आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धेत भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई साईखोम चानू हिने सुवर्णपदक जिंकले. मीराबाईने ४९ किलो वजनी गटातून ही कामगिरी केली. मीराबाई चानू हिने १९४ किलो वजन उचलून पहिला क्रमांक पटकावला. दरम्यान, मीराबाईला टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम रँकिंगच्यावेळी या जेतेपदाचा लाभ होणार आहे.
मीरबाईने आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धेत स्रॅच ८३ आणि क्लीन अॅण्ड जर्कमध्ये १११ किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. मीराबाईला दुखापत झाल्याने ती, २०१८ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तसेच त्यानंतरच्या आशियाई स्पर्धेत खेळू शकली नव्हती. दरम्यान, मीराबाईची सर्वोत्कृष्ट कामगिरी २०१ किलो वजन उचलण्याची आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्रता गाठण्यासाठी एका वेटलिफ्टरना नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०२० या कालावधीत प्रत्येक सहा महिन्यात किमान एक व एकूण सहा स्पर्धा खेळणे अनिवार्य असते. याशिवाय प्रत्येक खेळाडूला किमान एक सुवर्ण जिंकावेच लागते. यामुळं वेटलिफ्टरसाठी प्रत्येक स्पर्धा महत्वाची मानली जाते.
हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिकसाठीच्या मॅरेथॉन कोर्सचे झाले उद्घाटन
हेही वाचा - सामान्य परिस्थितीवर मात करून 'ती' झाली सुवर्णकन्या