टोकियो - भारतीय महिला वेटलिफ्टर मीरा चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिकमधील हे भारताचे पहिले पदक आहे. मणिपूरमध्ये चानूच्या कुटुंबियांनी आणि शेजारच्यांनी टीव्हीवर तिचा सामना पाहिला.
मीराबाई पदक जिंकण्याच्या जवळ पोहोचल्यानंतर इम्फाळमध्ये तिच्या कुटुंबियांनी प्रार्थना करण्यास सुरूवात केली. मीराबाईने जेव्हा पदक जिंकले, तेव्हा सर्वांनी एकच जल्लोष केला. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
#WATCH | Manipur: Family and neighbours of weightlifter Mirabai Chanu burst into celebrations as they watch her win the #Silver medal for India in Women's 49kg category. #OlympicGames pic.twitter.com/F2CjdwpPDc
— ANI (@ANI) July 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Manipur: Family and neighbours of weightlifter Mirabai Chanu burst into celebrations as they watch her win the #Silver medal for India in Women's 49kg category. #OlympicGames pic.twitter.com/F2CjdwpPDc
— ANI (@ANI) July 24, 2021#WATCH | Manipur: Family and neighbours of weightlifter Mirabai Chanu burst into celebrations as they watch her win the #Silver medal for India in Women's 49kg category. #OlympicGames pic.twitter.com/F2CjdwpPDc
— ANI (@ANI) July 24, 2021
देशभरातून मीराबाई चानूवर शुभेच्छांचा वर्षाव
मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकल्यानंतर तिच्यावर देशभरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्यासह देशभरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी चानूचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर नेटिझन्स चानूचे फोटो तुफान शेअर करत आहेत.
कर्णम मल्लेश्र्वरीने सिडनी ऑलिम्पिक 2000 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. तिने त्यावेळी एकूण 240 किलोग्राम वजन उचलले होते. स्नॅचमध्ये 110 तर क्लीन अॅन्ड जर्कमध्ये 130 किलोग्राम वजन उचलत मल्लेश्र्वरीने कांस्य पदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी मल्लेश्र्वरी पहिली आहे. तर आज मीराबाईने रौप्यपदक जिंकले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई भारताची पहिली खेळाडू आहे.
हेही वाचा - मीराबाई चानू: लाकडाचा भारा उचलण्यापासून ते ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकण्यापर्यंतचा प्रवास
हेही वाचा - संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करते; रौप्यपदक जिंकल्यानंतर मीराबाईची मन जिंकणारी प्रतिक्रिया