ETV Bharat / sports

विवोची आयपीएलपाठोपाठ 'या' स्पर्धेतूनही एक्झिट

author img

By

Published : Aug 8, 2020, 1:38 PM IST

२०१७ मध्ये विवोने प्रो कबड्डीसह प्रसारणकर्ता स्टार इंडियासोबत ३०० कोटींचा करार केला होता. दरवर्षी प्रायोजक म्हणून विवो आणि प्रो कबड्डी यांच्यात ६० कोटींचा व्यवहार होता. एका वृत्तानुसार, नकारात्मक प्रचारामुळे विवोने फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

vivo wont be the title sponsor for pro kabaddi league
आयपीएलपाठोपाठ विवोची 'या' स्पर्धेतूनही एक्झिट

नवी दिल्ली - यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) मुख्य प्रायोजकत्वापासून माघार घेतल्यानंतर विवोने अजून एका स्पर्धेतून आपले नाव काढून घेतले आहे. अल्पावधीत प्रसिद्धी मिळालेल्या प्रो-कबड्डी लीगच्या मुख्य प्रायोजकत्वामधूनही विवोने एक्झिट घेतली. जूनमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर देशात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याविषयी मत झाले होते.

२०१७ मध्ये विवोने प्रो कबड्डीसह प्रसारणकर्ता स्टार इंडियासोबत ३०० कोटींचा करार केला होता. दरवर्षी प्रायोजक म्हणून विवो आणि प्रो कबड्डी यांच्यात ६० कोटींचा व्यवहार होता. एका वृत्तानुसार, नकारात्मक प्रचारामुळे विवोने फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत विवोला कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याप्रकरणी अनेकांनी निषेध व्यक्त केला. विवोचे नाते तुटल्यानंतर यंदाच्या आयपीएललाही नवीन प्रायोजक मिळणार आहे. एका वृत्तानुसार, विवो २०२१ मध्ये परत आयपीएलचा भाग होणार असून त्यांचा करार २०२३ पर्यंत कायम राहील.

विवो कंपनी बीसीसीआयला मुख्य प्रायोजकत्वासाठी दरवर्षी ४४० कोटी रुपये देते. विवोने २०१८ मध्ये २१९९ कोटींसह पाच वर्षांसाठी करार केला होता. हा करार २०२२ मध्ये संपुष्टात येणार होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.