ETV Bharat / sports

विनेश फोगाटने विश्वविजेत्या खेळाडूला धूळ चारत पटकावलं सुवर्णपदक

किव्ह आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विनेशने २०१७ सालची विश्वविजेती व्ही. कॅलाडझिन्स्कायचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

vinesh phogat wins gold at ukraine wrestling event
विनेश फोगाटने विश्वविजेत्या खेळाडूला धूळ चारत पटकावलं सुवर्णपदक
author img

By

Published : Mar 1, 2021, 10:18 AM IST

मुंबई - भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाटने विश्वविजेत्या खेळाडूला चितपट करत सुवर्णपदक जिंकले. किव्ह आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विनेशने २०१७ सालची विश्वविजेती व्ही. कॅलाडझिन्स्काय हिचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या विनेशला ५३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या बेलारूसच्या कॅलाडझिन्स्कायने कडवी झुंज दिली.

विनेशने सुरुवातीला ४-० अशी आघाडी घेतली. मग कॅलाडझिन्स्कायने ४-४ अशी बरोबरी साधली. मग विनेशने पुन्हा ६-४ अशी आघाडी घेतली. तेव्हा कॅलाडझिन्स्कायने दडपण वाढवत चार गुणांची कमाई करत विनेशला अडचणीत आणले. तेव्हा विनेशने चार गुणांची कमाई करीत १०-८ अशा फरकाने सामना जिंकला.

हेही वाचा - आष्टीच्या शायान अलीची महाराष्ट्र केसरीसाठी निवड, 92 किलो वजन गटात करणार बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

हेही वाचा - हिमा दास झाली पोलीस अधिकारी!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.