ETV Bharat / sports

स्पेनमध्ये विनेश आणि दिव्याने केली सुवर्णकमाई!

या स्पर्धेत रशियाने सांघिक जेतेपद तर, भारताने सांघिक उपविजेतेपद जिंकले आहे.

स्पेनमध्ये विनेश आणि दिव्याने केली सुवर्णकमाई!
author img

By

Published : Jul 10, 2019, 8:22 AM IST

माद्रिद - भारताच्या महिला कुस्तीपटू विनेश फोगट आणि दिव्या काक्रन यांनी स्पेनमध्ये तिरंगा रोवला आहे. विनेश आणि दिव्याने स्पेन ग्रां.प्रि. कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. विनेशने अंतिम फेरीत डच खेळाडू जेसिका ब्लाझका तर, दिव्याने पोलंडच्या अग्निझेका कोर्डुस हिचा पराभव केला. या स्पर्धेत रशियाने सांघिक जेतेपद तर, भारताने सांघिक उपविजेतेपद जिंकले आहे.

विनेशने ही विजयी कामगिरी ५३ किलो वजनी गटात केली. तिने जस्टीना बेनिट्‌स (पेरू) व निना मिंकेनोवा (रशिया) यांच्यावर विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दिव्या काक्रनने 68 किलो गटातून खेळताना सुवर्णपदक पटकावले आहे. भारताने या दोन पदकांबरोबर एक रौप्य आणि तीन कांस्यपदके मिळवली आहेत. ५७ किलो वजनी गटातून पूजा धांडा हिने रौप्यपदक मिळवले. तर, ५० किलो वजनी गटातून सीमाकुमारी, ५९ किलो वजनी गटातून मंजुकुमारी, ७६ किलो वजनी गटातून किरणकुमारी यांनी कांस्यपदके पटकावली आहेत.

ऑलिंपिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारी साक्षी मलिकने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली होती.

Intro:Body:

vinesh phogat, divya kakran, gold, GranPremioDeEspana,wrestling competition

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.