ETV Bharat / sports

उसेन बोल्टने मुलीला दिले खास नाव...शेअर केला 'क्यूट' फोटो

बोल्टच्या मुलीचे नाव सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ऑलिम्पिया हे मूळचे ग्रीक नाव आहे, ज्याचा अर्थ "देवांचा पर्वत" असा आहे. दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सनेही आपल्या मुलीचे नाव ऑलिम्पिया ठेवले आहे. ''ऑलिम्पिया लाइटनिंग बोल्ट'', असे बोल्टने आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

Usain Bolt shares first photo of his daughter olympia lightning bolt
उसेन बोल्टने मुलीला दिले खास नाव...शेअर केला 'क्यूट' फोटो
author img

By

Published : Jul 8, 2020, 2:44 PM IST

Updated : Jul 11, 2020, 4:01 PM IST

मेलबर्न - आठवेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता माजी धावपटू उसेन बोल्ट सध्या त्याच्या गोंडस मुलीच्या नावामुळे चर्चेत आला आहे. उसेन बोल्ट आणि त्याची प्रेयसी कॅसी बेनेट यांना एक मुलगी झाली असून त्यांनी तिचे नाव 'ऑलिम्पिया लाइटनिंग बोल्ट' असे ठेवले आहे. दोघांनीही कुंटुंबात मुलीचे स्वागत केले.

बोल्टच्या मुलीचे नाव सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ऑलिम्पिया हे मूळचे ग्रीक नाव आहे, ज्याचा अर्थ "देवांचा पर्वत" असा आहे. दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सनेही आपल्या मुलीचे नाव ऑलिम्पिया ठेवले आहे. ''ऑलिम्पिया लाइटनिंग बोल्ट'', असे बोल्टने आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत आठ सुवर्णपदक जिंकणाऱ्या बोल्टच्या नावावर अजूनही 100 व 200 मीटर शर्यतीचा विश्वविक्रम आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2016 मध्ये बोल्टने सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत 100 व 200 मीटर शर्यतीचे जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव पुरुष धावपटू आहे.

बोल्टने 2002 मध्ये विश्व ज्युनियर चॅम्पियनशीपच्या 200 मीटरच्या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्यावेळी तो जागतिक स्तरावरील सर्वात कमी वयात सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू ठरला होता. त्याने 2017 मध्ये निवृत्ती जाहीर केली.

Last Updated : Jul 11, 2020, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.