लंडन - नोवाक जोकोविचने मंगळवारी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ( Novak Djokovic Speaking to BBC ) सांगितले की, जर त्याला टेनिस खेळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक असेल, तर तो फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनमधून ( French Open and Wimbledon ) स्पर्धेतून बाहेर होण्यासाठी तयार आहे.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नोवाक म्हणाला, त्याने लसीचा डोस घेतल नाही आणि म्हणाला की, पुढील दोन मोठ्या स्पर्धेत आणि इतर स्पर्धा मिस करण्याची किंमत मोजण्यासाठी तो तयार आहे. तसेच जोकोविच पुढे म्हणाला, माझ्या निर्णयाचे परिणाम मला समजतात.
मला समजते आणि तुम्हाला देखील माहित आहे की, आज लसीकरण न केल्यामुळे, मी या क्षणी बर्याच स्पर्धांमध्ये प्रवास करू शकत नाही. या अगोदर नोवाक जोकोविचने 20 वेळा ग्रँडस्लॅम ( The 20-time Grand Slam Winner ) जिंकले आहे.