ETV Bharat / sports

रौप्य पदक विजेती भाविनाबेन पटेल टोकियो पॅराऑलिम्पिकआधी काय म्हणाली होती? - bhavinaben patel

टोकियो पॅराऑलिम्पिकला जाण्याआधी 'ईटीव्ही भारत'ने भाविनाबेन पटेलसोबत बातचित केली. यात तिने म्हटलं होतं की, कठोर सराव आणि समपर्ण दिल्यास काहीही अशक्य नाही.

tokyo paralympics : silver medal winner bhavnaben patel exclusive interview with etv bharat
रौप्य पदक विजेती भाविनाबेन पटेल टोकियो पॅराऑलिम्पिकआधी काय म्हणाली?
author img

By

Published : Aug 29, 2021, 7:18 PM IST

अहमदाबाद - टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये महिला टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल हिने ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले. पॅराऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भाविनाबेन भारताची दुसरी माहिला खेळाडू ठरली. याआधी दीपा मलिक हिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. दरम्यान, टोकियो पॅराऑलिम्पिकला जाण्याआधी 'ईटीव्ही भारत'ने भाविनाबेन पटेलसोबत बातचित केली. यात तिने म्हटलं होतं की, कठोर सराव आणि समपर्ण दिल्यास काहीही अशक्य नाही.

भाविनाबेन पटेलसोबत 'ईटीव्ही भारत'चे ब्यूरो चीफ भरत पंचाल यांनी बातचित केली. यात भाविनाबेन म्हणाली की, टोकियो पॅराऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे हे माझे स्वप्न होते. यासाठी मी पूर्ण तयारी केली होती. मी एका लहान गावातून आले. यामुळे शहरात राहणे, तेथील परिस्थितीशी जुळूवून घेणे हे माझ्यासाठी एक चॅलेज होते. पण हळूहळू सर्व काही ठीक होत गेले. मला खेळात पुढे आणण्यात, ब्लाईंड पीपल्स असोसिएशनने चांगला प्लॅटफॉर्म दिला. यामुळेच मी पुढे येऊ शकले.

ईटीव्ही भारतचे ब्यूरो चीफ भरत पंचाल यांच्यासोबत बोलताना भाविनाबेन पटेल

भाविनाबेन पटेलचे प्रशिक्षक लालन दोषी यांनी सांगितलं की, प्रत्येक देशाचे खेळाडू, इतर खेळाडूंचे सामन्याचे व्हिडिओ पाहून पुढील रणणिती आखतात. पण भाविनाबेन अशी रणणिती आखत नाही. ती दररोज 8 ते 9 तास सराव करते. यामुळे तर ती जागतिक क्रमवारीत 8व्या स्थानावर आहे.

भाविनाबेन पटेलची नरेंद्र मोदींशी भेट -

2010 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेसाठी नरेंद्र मोदी यांनी भाविनाबेन पटेला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.

रौप्य पदक जिंकल्यानंतर भाविनाबेन पटेल काय म्हणाली?

रौप्य पदक जिंकल्यानंतर भाविनाबेन म्हणाली की, जेव्हा मी पहिल्यांदा जॉर्डनमध्ये सामना खेळण्यासाठी गेले. तिथे चीन, कोरिया आणि इतर देशाचे खेळाडू पाहून वाटलं होतं की, एक दिवस नक्कीच यांना आपण पराभूत करू. आज तो दिवस आला. याचे श्रेय ब्लाईंड पीपल्स असोसिएशन, भारतीय पॅराऑलिम्पिक समिती, भारतीय क्रीडा प्राधिकरण, टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रशिक्षक, कुटुंबिय आणि मित्रांना जाते.

दरम्यान रौप्य पदक जिंकल्यानंतर भाविनाबेन पटेलवर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा - Tokyo Paralympics : टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलने जिंकले रौप्य पदक

हेही वाचा - Tokyo Paralympics : उंच उडीत निषाद कुमारची कमाल, देशाला जिंकून दिलं दुसरे रौप्य पदक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.