ETV Bharat / sports

Tokyo Paralympics : रौप्य पदक जिंकणाऱ्या भाविनाबेन पटेलचे राष्ट्रपती कोविंदसह मोदींनी केलं कौतुक

author img

By

Published : Aug 29, 2021, 3:17 PM IST

Updated : Aug 29, 2021, 6:17 PM IST

टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या भाविनाबेन पटेलचे, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमवेत अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.

President, PM lead country in congratulating Bhavina Patel for winning Paralympic silver
रौप्य पदक जिंकल्यानंतर भाविनाबेन पटेलचे राष्ट्रपती कोविंदसह मोदींनी केलं कौतुक

मुंबई - टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये महिला टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने इतिहास रचला. तिने महिला एकेरी क्लास 4 मध्ये रौप्य पदक जिंकले. भारताचे टोकियो पॅराऑलिम्पिकमधील हे पहिले पदक आहे. भाविनाबेन पटेलच्या या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केलं.

भाविनाबेन पटेलचा अंतिम सामन्यात जगातील नंबर वन चीनी खेळाडू झाउ यिंग हिने 3-0 ने पराभव केला. यामुळे भाविनाबेन पटेलला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पण ती पॅराऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची दुसरी महिला ठरली. याआधी दीपा मलिक हिने रिओ ऑलिम्पिकमध्ये गोळाफेक खेळात रौप्य पदक जिंकले होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं कौतुक

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत भाविनाबेन पटेलचे अभिनंदन केले. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की, भाविनाबेन पटेलने पॅराऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकत भारतीय संघ आणि क्रीडा प्रेमींना प्रेरित केले आहे. खेळाप्रती बांधिलकी आणि कौशल्याने तिने देशाचे गौरव वाढवला. या कामगिरीबद्दल मी भाविनाबेन पटेलचे अभिनंदन करतो.

  • Bhavina Patel inspires the Indian contingent and sportslovers winning silver at #Paralympics. Your extraordinary determination and skills have brought glory to India. My congratulations to you on this exceptional achievement.

    — President of India (@rashtrapatibhvn) August 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट केले आहे. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, भाविनाबेन पटेलने इतिहास रचला. तिने ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले. या कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन. तिचा हा प्रेरणादायी प्रवास इतरांना खेळाशी जोडेल.

  • The remarkable Bhavina Patel has scripted history! She brings home a historic Silver medal. Congratulations to her for it. Her life journey is motivating and will also draw more youngsters towards sports. #Paralympics

    — Narendra Modi (@narendramodi) August 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, कोविंद, मोदी यांच्यासोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भाविनाबेन पटेलचे अभिनंदन केले आहे. भाविनाबेन पटेल ही गुजरातच्या मेहसाणा बडनगरमधील सुंधिया गावाची रहिवाशी आहे.

हेही वाचा - Tokyo Paralympics : टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलने जिंकले रौप्य पदक

हेही वाचा - Tokyo Paralympics स्पर्धेमधील फोटो पाहून तुम्ही हैराण व्हाल!

Last Updated : Aug 29, 2021, 6:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.