टोकियो - भारतीय भालाफेकपटू सुमित अंतिलने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले. सुमितच्या सुवर्ण कामगिरीबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे देखील राहुल गांधींनी कौतुक केले आहे.
राहुल गांधी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की, दिवसाची सुरूवात अवनी लेखराने सुवर्ण पदक जिंकल्याच्या बातमीने झाली. तिचे खूप खूप अभिनंदन. आणखी एका मुलीने भारताचे नाव उज्वल केले.
सुमित अंतिलने भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यानंतर राहुल गांधी म्हणतात की, सुमित अंतिलचे सुवर्ण पदकासाठी अभिनंदन. संपूर्ण देश अद्भभूत धैर्य आणि समर्पणासाठी तुझी प्रशंशा करत आहे.
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी देखील अवनी लेखरा आणि सुमित अंतिल यांचे कौतुक केले आहे. त्या त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की, अवनी लेखरा जी, तुमचे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण देशासाठी हा गौरवाचा क्षण आहे. सुमित अंतिलचे अभिनंदन. ऐतिहासिक प्रदर्शनावर संपूर्ण देशाला अभिमान आहे.
सुमित अंतिल याने पुरुषांच्या F64 भालाफेक गटात पहिल्याच प्रयत्नात 66.95 मीटर लांब भाला फेकत विश्वविक्रम नोंदवला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने आणखी लांब भाला फेकताना 68.8 मीटरसह नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
तिसऱ्या प्रयत्नात सुमित अंतिल याने 65.27 मीटर लांब भालाफेक फेकला. पण इतर स्पर्धकांच्या तुलनेत त्याने याही फेरीत चांगली कामगिरी करून दाखवली. पाचव्या प्रयत्नात त्याने पुन्हा 68.55 मीटर लांब भाला फेकत पुन्हा स्वतःचाच विश्वविक्रम मोडला. या कामगिरीसह त्याने सुवर्णपदक आपल्या नावे केला.
याआधी, टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया याने आज सकाळी रौप्य पदक जिंकले. तर दुसरा भालाफेकपटू सुंदर सिंह गुर्जर याने कास्य पदक जिंकले आहे.
हेही वाचा - Tokyo Paralympics : मानलं रे पठ्ठ्या! विश्वविक्रमासह सुमित अंतिलने जिंकले सुवर्ण पदक
हेही वाचा - Tokyo Paralympics: सुमित अंतिलची 'सुवर्ण' कामगिरी, पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींनी केलं अभिनंदन