टोकियो - भारतीय महिला कुस्तीपटूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये निराश केलं आहे. भारतीय कुस्तीपटू सीमा बिस्ला आपल्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाली. महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात ट्युनिशियाच्या सारा हमदी हिने सीमाचा पराभव केला. साराने हा सामना 3-1 असा जिंकला. दरम्यान, सीमा बिस्लाला कास्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी मिळू शकते.
सामन्याच्या सुरुवातीला एक गुण घेत साराने आघाडी मिळवली. तिने ती आघाडी पहिले सत्र संपेपर्यंत कायम राखली. त्यानंतर साराने सीमाचे मनगट अकडवून ठेवले होते, त्यामुळे तिला डाव लावता आला नाही. रेफरीने तिला आक्रमणासाठी 20 सेकंदाचा वेळ दिला. मात्र, ती साराच्या तावडीतून सुटण्यात अपयशी ठरली. त्यामुळे तिला गुण गमवावे लागले. यादरम्यान, सीमा एक गुण घेण्यात यशस्वी ठरली. पण तिला अखेरीस सीमाला 3-1 ने पराभूत व्हावं लागलं.
सीमा बिस्ला कास्य पदकासाठी खेळण्यासी संधी कशी मिळू शकते
सीमा बिस्ला कास्य पदकासाठी खेळण्यासी संधी मिळू शकते. पण त्यासाठी ट्युनिशियाची सारा हमदीने अंतिम फेरी गाठली पाहिजे. जर सारा अंतिम फेरीत पोहोचली तर सीमा बिस्ला हिला रेपेचाज राउंडमध्ये कास्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी मिळू शकते.
बजरंग पुनिया उपांत्य फेरीत
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदकाचा दावेदार असलेला कुस्तीपटू बजरंग पुनियाने उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला आहे. त्याने आशियाई चॅम्पियनशीपमधील कास्य पदक विजेता इराणचा मोर्टेजा घियासी याला चितपट करत 65 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली.
हेही वाचा - Tokyo Olympics : रणरागिणी अखेरपर्यंत लढल्या! महिला हॉकी संघाचे कास्य पदकाचे स्वप्न भंगले
हेही वाचा - Tokyo Olympic : बजरंग पुनिया प्रतिस्पर्धीला धूळ चारत उपांत्य फेरीत