ETV Bharat / sports

Tokyo Olympics: पूजा राणी पदकापासून एक पाऊल दूर, अल्जेरियाच्या बॉक्सरचा केला पराभव - pooja rani

भारताची महिला बॉक्सर पूजा राणीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये, आज बुधवारी 75 किलो वजनी मिडलवेट गटात खेळताना राउंड 16 मधील सामन्यात अल्जेरियाच्या इचरक चाइब हिचा 5-0 ने पराभव केला.

tokyo olympics indian boxer pooja rani wins the second round 5-0 too vs ichrak chaib of algeria
Tokyo Olympics: पूजा राणी पदकापासून एक पाऊल दूर, अल्जेरियाच्या बॉक्सरचा केला पराभव
author img

By

Published : Jul 28, 2021, 4:27 PM IST

Updated : Jul 28, 2021, 5:17 PM IST

टोकियो - भारताची महिला बॉक्सर पूजा राणीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये शानदार सुरूवात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने आज बुधवारी 75 किलो वजनी मिडलवेट गटात खेळताना राउंड 16 मधील सामन्यात अल्जेरियाच्या इचरक चाइब हिचा 5-0 ने पराभव केला.

पूजा राणीचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना 31 जुलै रोजी होणार आहे. या सामन्यात पूजा राणी तिसऱ्या मानांकित चीनच्या ली कियान हिच्याविरुद्ध रिंगमध्ये उतरेल. पूजाने दोन वेळा आशियाई चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. या दरम्यान, तिने चीनच्या ली कियान हिला पराभूत केले होते. जर पूजाने ली कियान विरुद्धचा सामना जिंकला तर तिचे पदक निश्चित होईल.

पूजा राणी आणि अल्जेरियाच्या चाइब हिचे हे पहिलं ऑलिम्पिक आहे. परंतु पूजा अनूभवी खेळाडू आहे. ती अल्जेरियाच्या खेळाडूवर भारी पडली. पहिल्या राउंडममध्ये पूजाने चाइबला शानदार पंच मारले. त्यामुळे पंचांनी पहिल्या राउंडमध्ये पूजाला चांगले गुण दिले.

दुसऱ्या राउंडमध्ये पूजाने हाच धडाका कायम ठेवला. तिने सलग दोन दमदार पंच मारले. तेव्हा अल्जेरियाच्या खेळाडूने अटॅक करण्याचा प्रयत्न केला. पण पूजाने डिफेंन्सिव टेकनिक दाखवत तिचे आक्रमण परतावून लावले. दुसऱ्या राउंडमध्ये देखील पूजाची कामगिरी सरस ठरली.

तिसऱ्या आणि अखेरच्या राउंडमध्ये पूजा प्रतिस्पर्धी खेळाडूवर भारी पडली आणि तिने हा सामना आपल्या नावे केला. पूजाला पाचही पंचांनी पूर्ण 30-30 गुण दिले. तर चाइबला पहिल्या पंचाने 26 तर इतर पंचांनी प्रत्येकी 27-27 गुण दिले.

पूजा राणीने मार्च 2020 मध्ये आयोजित ऑलिम्पिक पात्रता फेरीची उपांत्य फेरी गाठत ऑलिम्पिकचा कोटा मिळवला. या कामगिरीसह ती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय बॉक्सर देखील ठरली होती. चौथ्या मानांकित पूजाने उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या पॉरनिपा चूटी हिचा 5-0ने पराभव करत ही कामगिरी केली होती. दरम्यान, तिला उपांत्य फेरीत चीनच्या ली कियान हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

हेही वाचा - Tokyo Olympics: मराठमोळा तिरंदाज प्रविण जाधव हरला; पण लढला

हेही वाचा - tokyo olympics : दीपिका कुमारी पदकापासून एक पाऊल दूर

Last Updated : Jul 28, 2021, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.