ETV Bharat / sports

Olympics Gold Medallist Neeraj Chopra : नीरज चोप्राची मुलांना सरप्राईज भेट; पाहा काय दिला संदेश - देशासाठी भालाफेकीत प्रथमच ऑलिम्पिक सुवर्णपदक

देशातील भालाफेक स्टार नीरज चोप्रा हा तरुणांसाठी आदर्श आहे. लहान मुलेही नीरजला ओळखतात आणि त्याच्यावर खूप प्रेम करतात. नीरजलाही मुलांवर खूप प्रेम आहे. त्याचे प्रेम त्याला बंगळुरुच्या शाळेत घेऊन गेले. त्याला पाहून मुले आश्चर्यचकीत तर झालीच पण त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया नीरजला खूप आवडल्या. पाहुया त्याला पाहून मुलांनी कशी प्रतिक्रिया दिली.

Olympics Gold Medallist Neeraj Chopra
नीरज चोप्राची मुलांना सरप्राईज भेट
author img

By

Published : Mar 27, 2023, 1:45 PM IST

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक २०२२ मध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा मुलांना भेटण्यासाठी बेंगळुरू येथील शाळेत पोहोचला. जेव्हा मुलांनी त्याला वर्गात पाहिले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. नीरजला पाहून काही मुले भावूक झाली आणि त्याला मिठी मारून रडू लागली. अनेक मुलांनी नीरजला विचित्र प्रश्न विचारले, जे ऐकून त्याला हसू आवरले नाही. मुलांच्या सर्व प्रश्नांना नीरज चोप्राने उत्तरे दिली.

  • शनिवार है surprises का दिन! 😉 इन छोटे बच्चों से मिलकर बहुत मजा आया |

    They are the future of our great nation! 🇮🇳 pic.twitter.com/eTyDvf9sHb

    — Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) March 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वर्गात नीरज चोप्राला पाहून मुले आश्चर्यचकीत : वर्ग सुरू असताना ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचे चरित्र मुलांना शिकवले जात होते. मुले शिकत असताना नीरजने वर्गात पोहोचून सर्वांना शुभेच्छा दिल्या. मुलांनी नीरजला आपल्यात पाहिल्यावर त्यांचा विश्वासच बसेना. पण, जेव्हा नीरज मुलांशी बोलला तेव्हा त्यांना विश्वास पटला. मग मुलांनी नीरजसोबत मिसळून खूप मजा केली. त्याच्याशी हस्तांंदोलन केले, त्याची गळाभेठ घेतली. त्याच्याशी खेळावर मोठी चर्चा केली.

शाळेतील मुलांना भेटला ऑलिम्पिकपटू नीरज चोप्रा : शाळेच्या प्रशासनाने अगोदरच, ज्यांना खेळाची आवड आहे त्याच मुलांनी शाळेत यायचे असे सांगितले होते. त्यांच्यासाठी एक सरप्राईज असल्याची सूचनाच शाळा प्रशासनाने मुलांना दिली होती. नीरजचे सरप्राईज पाहून मुलांनी आनंदाने उड्या मारल्या. अनेकजण आनंदाने रडू लागले. नीरजला भेटणारी सर्व मुले खेळात आहेत. देशासाठी पदक जिंकण्याचेही त्यांचे स्वप्न आहे. मुलांनी नीरजकडून गेममध्ये पुढे जाण्यासाठी टिप्सही घेतल्या. नीरज म्हणाला की, खेळात कधीही हार मानू नये. अपयशाने तुम्ही थांबता कामा नये, नेहमी पुढे जात राहिले पाहिजे.

देशासाठी भालाफेकीत प्रथमच ऑलिम्पिक सुवर्णपदक : सतत मेहनत केली, तर एक दिवस विजय आपल्या पायांचे चुंबन नक्कीच घेईल. नीरज चोप्राने भालाफेकीत देशासाठी प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नीरज चोप्रा यांच्यामुळे तरुणांवर खूप प्रभाव आहे. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. नीरजने भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले ते ऑलिम्पिक संग्रहालयाला दान करण्यात आले.

हेही वाचा : BCCI Annual Grade : बीसीसीआयच्या वार्षिक करारात रवींद्र जडेजाची बढती, अजिंक्य रहाणेला वगळले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.