टोकियो - भारताचा अनुभवी टेबल टेनिस स्टार अचंता शरथ कमल याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरूष एकेरीची तिसरी फेरी गाठली आहे. तिसऱ्या फेरीत त्याचा सामना गतविजेत्या खेळाडूंशी होणार आहे.
शरथ कमल याने टोकियो मेट्रोपॉलिटन जीम टेबल नं1 वर झालेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात पोर्तुगालच्या टियागो अपोलोनिया याचा पराभव केला.
शरथ कमलचे हे चौथे ऑलिम्पिक आहे. त्याने दुसऱ्या सामना 49 मिनिटात 2-11, 11-8, 11-5, 9-11, 11-6, 11-4 असा जिंकला.
शरथ कमलने पहिला गेम अवघ्या चार मिनिटात 2-11 असा गमावला. त्यानंतर त्याने शानदार वापसी करत पुढील दोन गेम जिंकत 2-1 अशी बढत घेतली. पण टियागोने चौथा गेम जिंकत स्कोर 2-2 केला.
2004 मध्ये ऑलिम्पिक डेब्यू केलेल्या शरथ कमलने सामना जिंकण्यासाठी आपला अनुभव पणाला लावला आणि पुढील दोन गेम जिंकत सामना 4-2 ने आपल्या नावे केला.
दरम्यान, शरथ कमलने मागील वर्षी ओमान ओपन स्पर्धा जिंकली होती. याआधी कोरोनामुळे सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. कमल लॉकडाउनच्या काळात चेन्नईमधील आपल्या घरात जोरदार सराव करत होता.
हेही वाचा - Tokyo Olympics : भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव
हेही वाचा - Tokyo Olympics : भवानी देवीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास