टोकियो - टोकियो ऑलिम्पिकच्या उद्धाटन सोहळ्यात पाकिस्तानच्या ध्वजवाहकांनी कोरोनाच्या नियमांची पायमल्ली केली. शुक्रवारी जपानच्या नॅशनल स्टेडियममध्ये टोकियो ऑलिम्पिकचा उद्धाटन सोहळा पार पडला. पाकिस्तानचे ध्वजवाहक या सोहळ्यात मास्क तोंडावर व्यवस्थित न लावता परेडमध्ये सहभागी झाले होते.
पाकिस्तान दलाच्या ध्वजवाहकाचा मान बॅडमिंटनपटू महूर शहजाद आणि नेमबाज खलील अख्तर यांना मिळाला होता. परेड दरम्यान, महूरचा मास्क तोंडा खाली तर खलीलची नाक मास्कने व्यवस्थित झाकलेली नव्हती. या दोघांशिवाय पाकचे इतर अॅथलेटिक्स व्यवस्थित मास्क लावलेले पाहायला मिळाले.
दरम्यान, पाकिस्तान शिवाय किर्गीस्तान आणि ताजिकिस्तानचे बहुतांश सदस्य उद्धाटन सोहळ्यात विना मास्क पाहयाला मिळाले.
भारतीय दलाचे ध्वजवाहक
कोरोनाच्या सावटाखाली टोकियो ऑलिम्पिकला शुक्रवारपासून सुरूवात झाली. ऑलिम्पिकच्या उद्धाटन सोहळ्यात भारतीय पुरूष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह आणि सहा वेळची विश्वविजेती बॉक्सर एमसी मेरी कोम हिने भारतीय दलाचे नेतृत्व केलं. टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताने 127 अॅथलेटिक्सचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ टोकियोला पाठवला आहे.
हेही वाचा - Tokyo Olympics : रोमहर्षक सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय; टोकियोमध्ये विजयी सलामी
हेही वाचा - Tokyo Olympics : दीपिका कुमारी-महाराष्ट्रीयन प्रविण जाधव यांची जोडी उपांत्यपूर्व फेरीत