ETV Bharat / sports

Tokyo Olympics: पराभवानंतर भवानी देवीने देशवासियांना म्हटलं, 'मला माफ करा'

टोकियो ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या फेरीतील पराभवानंतर तलवारबाज भवानी देवी निराश झाली आणि तिने देशवासियांची माफी मागितली.

tokyo-olympics-2020-indian-fencer-bhavani-devi-says-sorry-after-her-second-round-loss
Tokyo Olympics: पराभवानंतर भवानी देवीने देशवासियांना म्हटलं, 'मला माफ करा'
author img

By

Published : Jul 26, 2021, 1:25 PM IST

टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय तलवारबाज सीए भवानी देवीचे, आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. पहिल्या फेरीत दमदार विजय मिळवणारी भवानी देवी दुसऱ्या फेरीत फ्रान्सच्या मॅनॉन ब्रुनेटकडून पराभूत झाली. मॅनॉनने हा सामना 15-7 अशा फरकाने जिंकला. भवानी देवीने पहिल्या सामन्यात ट्युनिशियाच्या नादिया बेन अजिजीचा १५-३ ने धुव्वा उडवला होता. विशेष म्हणजे भवानी देवीने हा फक्त सहा मिनिटे १४ सेकंदांमध्ये जिंकला.

दरम्यान, दुसऱ्या फेरीतील पराभवानंतर भवानी देवी निराश झाली आणि तिने देशवासियांची माफी मागितली. भवानी देवीने एक ट्विट केलं आहे. त्यात ती म्हणते, 'हे खूप उत्साही आणि भावूक होतं. मी नादियाविरुद्धच्या सामना 15-3 अशा फरकाने जिंकत ऑलिम्पिकमध्ये सामना जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरले. पण दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या मॅनॉन ब्रुनेटकडून 7-15 ने मी पराभूत झाले. पण मी माझं सर्वश्रेष्ठ दिलं. तरी देखील मी जिंकू शकले नाही. मला माफ करा.'

  • Big Day 🤺
    It was Excitement & Emotional.
    I won the First Match 15/3 against Nadia Azizi and become the First INDIAN Fencing Player to win a Match at Olympic but 2nd Match I lost 7/15 against world top 3 player Manon Brunet. I did my level best but couldn't win.
    I am sorry 🙏 🇮🇳 pic.twitter.com/TNTtw7oLgO

    — C A Bhavani Devi (@IamBhavaniDevi) July 26, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सीए भवानी देवीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव खेळाडू आहे. तिचे हे पहिलं ऑलिम्पिक असून तिने पहिला सामना जिंकला. अशी कामगिरी करणारी भवानी देवी भारताची एकमात्र तलवारबाज आहे. भवानी देवीचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान जरी संपुष्टात आले तरी तिने करोडों भारतीयांची मने जिंकली आहेत.

हेही वाचा - Tokyo Olympics: मिशन फत्ते करून मीराबाई चानू भारताकडे रवाना

हेही वाचा - Tokyo Olympics : मानल राव! 13 वर्षीय मुलीने ऑलिम्पिकमध्ये जिंकलं सुवर्ण पदक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.