टोकियो - भारताचा अविनाश साबळे याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टिपलचेस स्पर्धेत नॅशनल विक्रम प्रस्तापित केला. परंतु तो टोकियो ऑलिम्पिकची दुसरी फेरी गाठण्यास अपयशी ठरला.
अविनाश साबळे याने 8:18.12 वेळ घेतला. मार्चमध्ये फेडरेशन कपमध्ये त्याने 8: 20.20 इतका वेळ घेत नॅशनल विक्रम नोंदवला होता. ऑलिम्पिकमध्ये त्याने आपलाच हा विक्रम मोडीत काढला. दुसऱ्या हीटमध्ये तो सातव्या स्थानी राहिला. दरम्यान, प्रत्येक हीटमधील अव्वल 3 आणि संपूर्ण हीटमधील अव्वल सहा खेळाडू फायनलसाठी पात्र ठरतात.
अविनाश साबळे दुर्दैवी ठरला. कारण तिसऱ्या हीटमध्ये अव्वल तीन खेलाडू त्याच्यापेक्षा कमी वेगाने धावले. सावळे क्वालिफाईंग हीटमध्ये सर्वश्रेष्ठ सातव्या आणि एकूण 13 व्या स्थानावर राहिला.
हेही वाचा - Tokyo Olympic : शाब्बाश पोरी! लवलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीत; भारताचे पदक पक्के
हेही वाचा - Tokyo Olympics : भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीची उपांत्यपूर्व फेरीत धडक