टोकियो - भारतीय घोडेस्वार फवाद मिर्झा क्रॉस कंट्री फेरीत 11.20 पेनल्टी गुण घेत 22व्या स्थानावर राहिला. तो उद्या सोमवारी वैयक्तिक शो जंपिक क्वालिफायरमध्ये चांगले प्रदर्शन करत टॉप 25 मध्ये राहू शकतो, अशी कामगिरी केल्यास तो इवेंटिंग जंपिकच्या वैयक्तिक गटात अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.
मिर्झाचे एकूण 39.20 पेनल्टी गुण आहेत. त्याने फक्त आठ मिनिटात कंट्री रन पूर्ण केली.
काया आहेत नियम
घोडेस्वारी खेळात क्रॉसकंट्री वैयक्तिक गटात स्पर्धकाला 7 मिनिटे 45 सेकंदाच्या आत कोर्सची पूर्ण फेरी मारावी लागतो. यानुसार पेनल्टी गुण दिले जातात. पेनल्टी गुण जितके कमी असतील, तितके स्पर्धकासाठी चांगलं असतं. तो क्रमवारी अव्वल ठरतो.
हेही वाचा - Tokyo Olympics: ऑस्ट्रेलियाच्या महिला जलतरणपटूचा विश्वविक्रम, एकाच ऑलिम्पिकमध्ये जिंकली 7 पदकं
हेही वाचा - Tokyo Olympics : 7 टाके पडलेले असताना देखील लढला पण हरला, बॉक्सर सतीश कुमारचा पराभव