टोकियो - भारतीय कुस्तीपटू दीपक पुनियाला अखेरच्या 30 सेंकदात कास्य पदकाने हुलकावणी दिली. या पराभवामुळे दीपक पुनियाला टोकियो ऑलिम्पिकमधून विनापदक माघारी परतावं लागणार आहे.
८६ किलो वजनी गटाच्या कास्य पदकासाठीच्या सामन्यात दीपक पुनियाचा सामना सॅन मारिनोच्या अॅमिने मायलेस नाझीम याच्याशी झाला. सामन्यात दीपकने सुरूवातीला २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दोन्ही खेळाडू बचावात्मक खेळ करताना दिसले. त्यामुळे अखेरच्या ६० सेकंदात उत्सुकता वाढली.
अखेरच्या ३० सेकंदात सॅन मारिनोच्या मायलेस नाझीम याने दीपकला जखडून ठेवत त्याला जमिनिवर गुडघे टेकण्यास भाग पाडले आणि आणि दोन गुणाची कमाई करत ३-२ अशी आघाडी घेतली. यावेळी भारतीय प्रशिक्षकांनी नाझीमविरोधात पंचांकडे दाद मागितली पण पंचांनी नाझीमच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर नाझीन याने आणखी एक गुण घेत सामना 4-2 अशा फरकाने जिंकला.
दरम्यान, दीपक पुनियाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला होता. परंतु त्याला रेपेचाजनुसार कास्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु या सामन्यात त्याला विजय मिळवता आला नाही.
रवी कुमार दहियाला रौप्य पदकावर समाधान
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाचा पराभव झाला. रशियाच्या झवुर युगुऐव याने रवी कुमार दहियाचा 7-4 ने पराभव केला. या पराभवासह रवी कुमार दहियाचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, भारताचे हे पाचवे पदक आहे. याआधी मीराबाई चानूने रौप्य तर पी. व्ही. सिंधू, लवलिना बोर्गोहेन आणि भारतीय पुरूष हॉकी संघाने कांस्य पदक जिंकलं आहे.
हेही वाचा - भाऊ सर्वांना शुभेच्छा सांग! पंतप्रधान मोदींचा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतला फोन
हेही वाचा - Tokyo Olympics : ऐतिहासिक विजयानंतर श्रीजेशची स्वारी थेट गोलपोस्टवर, फोटो होतोय व्हायरल