टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदकाचा दावेदार असलेला कुस्तीपटू बजरंग पुनियाने उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला आहे. त्याने आशियाई चॅम्पियनशीपमधील कास्य पदक विजेता इराणचा मोर्टेजा घियासी याला चितपट करत 65 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीत बजरंगसमोर अजरबैजानच्या हाजीचे आव्हान
बजरंग पुनिया 65 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याच्यासमोर आता अजरबैजानच्या हाजी अलीयेव याचे आव्हान आहे. अलीयेव याने 57 किलो वजनी गटात रिओ ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकलं आहे. तसेच तो 61 किलो वजनी गटात तब्बल तीन वेळा विश्वविजेता ठरला आहे.
बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी आरंभ केला. त्याने किर्गिस्तानच्या एर्नाजर अकामातलिवे याच्यावर टेकनिकल गुणांच्या आधारावर पराभव केला. उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बजरंग पुनियाने किर्गिस्तानच्या खेळाडूविरोधात 3-1 ने आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रात बजरंगने किर्गिस्तानच्या खेळाडूचा पाय पकडत त्याला खाली पाडण्याचा जोरदार प्रयत्न केला. परंतु किर्गिस्तानच्या खेळाडूचा दुसरा पाय त्याचा हातात आला नाही. यामुळे बजरंगला गुण मिळाल नाही.
अखेरच्या काही सेंकदात किर्गिस्तानच्या खेळाडूने जोरदाव वापसी करत दोन वेळा बजरंगला रिंग बाहेर ढकलले. यात त्याला दोन गुण मिळाले. यामुळे सामना 3-3 अशा बरोबरीत होता. पण बजरंगने एकाचवेळी दोन गुण घेतलेले असल्यामुळे त्याला विजता घोषित करण्यात आले.
हेही वाचा - Tokyo Olympics : हॉकी संघाच्या विजयानंतर मेजर ध्यानचंद यांच्या मुलाने केला आनंद व्यक्त, म्हणाले...
हेही वाचा - Tokyo Olympics : रणरागिणी अखेरपर्यंत लढल्या! महिला हॉकी संघाचे कास्य पदकाचे स्वप्न भंगले