ETV Bharat / sports

पॅरिस ऑलिम्पिकवरून अभिनव बिंद्रा म्हणाला... - Abhinav Bindra on Abhinav Bindra

पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकला 3 वर्षांचा कालावधी राहिला असून खेळाडूंसाठी हे ऑलिम्पिक आव्हानात्मक ठरणार आहे, असे मत अभिनव बिंद्राने व्यक्त केलं आहे.

Three-year Olympic cycle for Paris 2024 will be tricky: Abhinav Bindra
पॅरिस ऑलिम्पिकवरून अभिनव बिंद्रा म्हणाला...
author img

By

Published : Aug 19, 2021, 4:40 PM IST

मुंबई - टोकियो ऑलिम्पिक नुकतेच पार पडलं आहे. टोकियोत भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. आता पुढील ऑलिम्पिक 2024 ला पॅरिस येथे होणार आहे.

ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा भारताचा पहिला अॅथलिट शूटर अभिनव बिंद्राने पॅरिस ऑलिम्पिकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बिंद्राच्या मते, पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकला 3 वर्षाचा कालावधी राहिला असून खेळाडूंसाठी हे ऑलिम्पिक आव्हानात्मक ठरणार आहे.

अभिनव बिंद्रा ईएलएएमएस स्पोटर्स फाउंडेशनच्या वेबिनारमध्ये बोलताना म्हणाला, टोकियोत ऐतिहासिक प्रदर्शन राहिले आणि सात पदक भारतीय खेळाडूंची जिंकली. येथे काही क्षण चांगले तर काही भावूक करणारे पाहायला मिळाले. यालाच खेळ म्हणतात.

मी पुढील ऑलिम्पिक चक्राला थोडसे आव्हानात्मक मानतो. कारण यासाठी कमी कालावधी राहिला आहे. कारण खासकरून अॅथलिट ऑलिम्पिकनंतर एक वर्षापर्यत थोडसं रिलॅक्स राहतात. ज्यामुळे त्यांना आराम मिळतो आणि ते रिकवर होतात. पण यावेळी त्यांना तात्काळ वापसी करावी लागेल, असे देखील बिंद्रा म्हणाला. दरम्यान, बिंद्रा 2008 बिजिंग ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नेमबाज आहे.

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात पदके जिंकली. यात भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकले. तर महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि कुस्तीपटू रवी कुमार दाहिया यांनी रौप्य पदकाला गवसणी घातली. तर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, बॉक्सर लवलिना बोर्गोहेन, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि भारतीय हॉकी संघ कास्य पदकाचा विजेते ठरला.

कोरोना महामारीमुळे टोकियो ऑलिम्पिक एक वर्षांनी स्थगित करण्यात आले होते. सुरूवातीला ही स्पर्धा 2020 मध्ये होणार होती. परंतु कोरोनामुळे ही स्पर्धा 2021 मध्ये घेण्यात आली. ऑलिम्पिक दर चार वर्षांनी होते. परंतु कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक पुढे गेले आणि हा सर्कल बिघडला. आता पुढील ऑलिम्पिकला 3 वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

हेही वाचा - 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची सत्काराच्या वेळी तब्येत बिघडली

हेही वाचा - T-20 वर्ल्ड कप : 'या' दिवशी रंगणार भारत-पाक संघाचा पहिला सामना; वेळापत्रक जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.