नवी दिल्ली - भारताची राजधानी दिल्लीमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंचा सन्मान आज सोमवारी पार पडला. भारताला पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकून देत इतिहास रचणारा नीरज चोप्रा याच्याशिवाय, कास्य पदक जिंकणारा भारतीय पुरूष संघ, कास्य पदक विजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन, कास्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया, रौप्य पदक विजेता रवी कुमार दहिया यावेळी उपस्थित होते. या खेळाडूंनी आपला ऑलिम्पिकचा अनुभव सांगितला.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि केंद्रीय राज्यमंत्री निशिथ प्रमाणिक यांनी खेळाडूंचा सन्मान केला. यानंतर त्यांनी खेळाडूंची कौतुक केलं. या सन्मान सोहळ्यात सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राने आपलं मत मांडत देशवासियांचे मन जिंकलं. नीरज म्हणाला की, सगळ्याचे आभार. हे सुवर्ण पदक माझ्या एकट्याचं नाही तर संपूर्ण देशाचं आहे.
मी आधी सर्वांना आपलं पदक दाखवू इच्छितो. हे माझं नाही तर संपूर्ण देशाचं पदक आहे. पदक जिंकल्यापासून मी ते खिशात घालून फिरत आहे. विजयानंतर मी शांत झोपू शकलो नाही. ना ही मी व्यवस्थित जेवण करू शकलो आहे. मी जेव्हा या पदकाकडे पाहतो. तेव्हा मला सर्वकाही ठीक असल्याचे वाटतं. कष्ठ तर होतेच पण मनात भीती होती की, कॉम्पिटिशन खूप टफ आहे, असे देखील नीरज पुढे बोलताना म्हणाला. यावेळी नीरजच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
-
#WATCH | This gold medal is not only mine but also belongs to India. I didn't eat&sleep well after winning gold medal... Competition was very tough at #Olympics. After qualification, I realised this is the best opportunity of my life& I'll not lose it: Gold medalist Neeraj Chopra pic.twitter.com/NzQVFqvjLx
— ANI (@ANI) August 9, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | This gold medal is not only mine but also belongs to India. I didn't eat&sleep well after winning gold medal... Competition was very tough at #Olympics. After qualification, I realised this is the best opportunity of my life& I'll not lose it: Gold medalist Neeraj Chopra pic.twitter.com/NzQVFqvjLx
— ANI (@ANI) August 9, 2021#WATCH | This gold medal is not only mine but also belongs to India. I didn't eat&sleep well after winning gold medal... Competition was very tough at #Olympics. After qualification, I realised this is the best opportunity of my life& I'll not lose it: Gold medalist Neeraj Chopra pic.twitter.com/NzQVFqvjLx
— ANI (@ANI) August 9, 2021
पात्रता फेरीत जेव्हा थ्रो यशस्वी फेकला. तेव्हा माझ्या आयुष्यातील सुवर्ण संधी असल्याचा मला भास झाला. मला वाटत की, कॉम्पिटिशन पाहून घाबरलं नाही पाहिजे. हे मी माझ्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये अनुभवलो. कोणालाही न घाबरता आपलं शंभर टक्के योगदान देण्याची गरज असल्याचेही नीरज म्हणाला.
दरम्यान, नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलं. विशेष म्हणजे, ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारताचे हे पहिलं पदक आहे. नीरज अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला.
हेही वाचा - भारतीय पुरूष हॉकी संघाने जिंकलेले कास्य पदक, सुवर्ण पदकापेक्षा कमी नाही - संदीप सिंग
हेही वाचा - बजरंग पुनियाचे ग्रँड स्वागत; उघड्या जीपमधून काढली मिरवणूक