ETV Bharat / sports

प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम पुढे ढकलला - प्रो कबड्डी लीग न्यूज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वच स्पर्धाचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक क्रीडाप्रकारांना अद्याप परवानगी मिळाली नाही. प्रो कबड्डी लीगचा (पीकेएल) आठवा हंगाम कोरोना विषाणूच्या साथीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. आयोजकांनी शनिवारी लीगच्या संकेतस्थळावर याबद्दल माहिती दिली.

The eighth season of pro kabaddi league postponed
प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम पुढे ढकलला
author img

By

Published : Nov 29, 2020, 11:06 AM IST

नवी दिल्ली - प्रो कबड्डी लीगचा (पीकेएल) आठवा हंगाम कोरोना विषाणूच्या साथीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. आयोजकांनी शनिवारी लीगच्या संकेतस्थळावर याबद्दल माहिती दिली. "प्रो कबड्डी लीगचा आठवा टप्पा सद्यस्थिती आणि आरोग्याच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विचारामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. आम्ही नवीन वर्षात अधिक सुरक्षा व्यवस्था घेऊन परत येऊ", असे पीकेएलच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

The eighth season of pro kabaddi league postponed
प्रो कबड्डी लीग

हेही वाचा - कुस्तीपटू नरसिंह यादवला कोरोना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वच स्पर्धाचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक क्रीडाप्रकारांना अद्याप परवानगी मिळाली नाही. पीकेएलच्या सातव्या हंगामात बंगाल वॉरियर्सने प्रथमच विजेतेपद पटकावले. बंगालने ऑक्टोबर २०१९मध्ये दबंग दिल्लीला हरवले. त्याआधी जयपूरने पिंक पॅंथर, यू मुम्बा, पटना पायरेट्स आणि बंगळुरू बुल्स या संघांनी पीकेएलचे विजेतेपद पटकावले आहे.

हेही वाचा - शाहिद आफ्रिदीचे लंकेत वेगवान अर्धशतक, पण...

''खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह आहे. कबड्डीप्रेमीही या निर्णयाच्या पाठीशी राहतील, अशी आशा आहे'', असे जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार दीपक निवास हुडाने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.