नवी दिल्ली : महिला प्रीमियर लीग (WPL) ला टाटा समूहाच्या रूपाने टायटल स्पॉन्सर मिळाला आहे. आता याला टाटा डब्ल्यूपीएल असे या संघाला म्हटले जाणार आहे. भारतातील सर्वात मोठ्या उद्योगसमूह टाटाने WPL चे टायटल राइट्स विकत घेतले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 28 जानेवारी 2023 रोजी 2023 ते 2027 या पाच वर्षांसाठी महिला प्रीमियर लीग (WPL) च्या शीर्षक प्रायोजकत्व अधिकारांसाठी बोलीकरिता आमंत्रित केले होते. आता टाटा समूहाला तो अधिकार मिळणार आहे.
-
I am delighted to announce the #TataGroup as the title sponsor of the inaugural #WPL. With their support, we're confident that we can take women's cricket to the next level. @BCCI @BCCIWomen @wplt20 pic.twitter.com/L05vXeDx1j
— Jay Shah (@JayShah) February 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I am delighted to announce the #TataGroup as the title sponsor of the inaugural #WPL. With their support, we're confident that we can take women's cricket to the next level. @BCCI @BCCIWomen @wplt20 pic.twitter.com/L05vXeDx1j
— Jay Shah (@JayShah) February 21, 2023I am delighted to announce the #TataGroup as the title sponsor of the inaugural #WPL. With their support, we're confident that we can take women's cricket to the next level. @BCCI @BCCIWomen @wplt20 pic.twitter.com/L05vXeDx1j
— Jay Shah (@JayShah) February 21, 2023
या मीडिया हाऊसने घेतले हक्क विकत : जोपर्यंत मीडिया अधिकारांचा संबंध आहे, Viacom18 Media Pvt Ltd ने 2023-2027 या कालावधीसाठी WPL च्या मीडिया अधिकारांसाठी (म्हणजेच जागतिक दूरदर्शन अधिकार आणि जागतिक डिजिटल अधिकार) 16 जानेवारी रोजी एकत्रित बोली जिंकली. Viacom18 ने 951 कोटी रुपयांची बोली लावून हक्क विकत घेतले होते, म्हणजे प्रति सामना 7.09 कोटी रुपये असा आहे.
-
🚨JUST IN🚨
— Female Cricket (@imfemalecricket) February 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Tata Group attains the title rights for Women's Premier League#CricketTwitter #WPL | Source: Cricbuzz
">🚨JUST IN🚨
— Female Cricket (@imfemalecricket) February 21, 2023
Tata Group attains the title rights for Women's Premier League#CricketTwitter #WPL | Source: Cricbuzz🚨JUST IN🚨
— Female Cricket (@imfemalecricket) February 21, 2023
Tata Group attains the title rights for Women's Premier League#CricketTwitter #WPL | Source: Cricbuzz
बीसीसीआयला ४६६९.९९ कोटी रुपये मिळाले : यापूर्वी, पहिल्या डब्ल्यूपीएलच्या पाच संघांच्या विक्रीतून बीसीसीआयला ४६६९.९९ कोटी रुपये मिळाले होते. अदानी स्पोर्ट्सलाइनने अहमदाबादचा संघ १२८९ कोटी रुपयांना विकत घेतला, जो सर्वात महागडा संघ आहे. याशिवाय आयपीएल संघ मालक मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी 912.99 कोटी, 901 कोटी आणि 810 कोटी रुपयांसाठी यशस्वी बोली लावली होती. लखनौचा संघ कॅप्री ग्लोबल होल्डिंग्सने 757 कोटी रुपयांना विकत घेतला.
महिला प्रिमियर लीगची 4 मार्चपासून सुरूवात : महिला प्रीमियर लीग 4 मार्चपासून सुरू होणार असून अंतिम सामना 26 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल. WPL 2023 च्या पहिल्या सत्रात एकूण 22 सामने खेळवले जातील. ही स्पर्धा २३ दिवस चालणार आहे. या स्पर्धेत साखळी फेरीत 20 सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांशिवाय एलिमिनेटर आणि अंतिम सामना खेळवला जाईल.
महिला प्रिमिअर लीगचे शेड्यूल तयार झाले : महिला आयपीएल 2023 (WPL 2023) साठी महिला क्रिकेटपटूंच्या लिलावानंतर आता त्यात खेळणाऱ्या सर्व 5 संघांच्या महिला खेळाडूंची स्थिती स्पष्ट झाली आहे. कोणती महिला खेळाडू कोणत्या संघासोबत खेळणार हेदेखील कळले आहे. पाहूया या महत्त्वाच्या पाच संघांच्या खेळाडूंची यादी आणि त्यावरील सविस्तर रिपोर्ट. महिला क्रिकेट खेळाडूंच्या पहिल्या WPL 2023 लिलावासाठी, सर्व 5 संघांसाठी 87 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये 30 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यादरम्यान स्मृती मंधाना हिला सर्वाधिक ३.४ कोटी रुपयांना विकत घेतले गेले, तर अॅश्ले गार्डनर ३.२ कोटी रुपयांना विकली जाणारी सर्वात महागडी परदेशी खेळाडू ठरली. यादरम्यान, विशेष बाब म्हणजे अमेरिकेची तारा नॉरिस ही असोसिएट देशांमधून एकमेव खेळाडू म्हणून निवडली गेली.