ETV Bharat / sports

Deendayalan D Vishwa Car Accident : मेघालयात कार अपघातात तामिळनाडूचा टेबल टेनिसपटू डी विश्वाचा मृत्यू - ८३व्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा

तामिळनाडूचा युवा टेबल टेनिसपटू दीनदयालन विश्व याचा मेघालयमध्ये कार अपघातात मृत्यू झाला ( Deendayalan Vishwa dies in car accident ). या अपघातात अन्य तीन खेळाडू जखमी झाले आहेत. हे सर्वजण 83व्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शिलाँगला जात होते.

De Vishwa
De Vishwa
author img

By

Published : Apr 18, 2022, 5:30 PM IST

शिलाँग: मेघालयातील री-भोई जिल्ह्यात रविवारी झालेल्या एका रस्ते अपघातात टेबल टेनिसपटू दीनदयालन विश्व ( Table tennis player Deendayalan Vishwa ) यांचा मृत्यू झाला आहे, तर तामिळनाडूचे अन्य तीन खेळाडू जखमी झाले ( Three Tamil Nadu players injured ) आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची टॅक्सी एका 12 चाकी ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला. 83व्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत भाग घेण्यासाठी तमिळनाडूचे चार खेळाडू गुवाहाटी विमानतळावरून शिलाँगला टूरिस्ट टॅक्सीने ( Shillong Tourist Taxi ) जात होते. पोलिसांनी सांगितले की, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शांगबंगला परिसरात दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका 12 चाकी ट्रकने टॅक्सीला धडक दिली.

मेघालय टेबल टेनिस असोसिएशन ( Meghalaya Table Tennis Association ) ने एका निवेदनात म्हटले आहे की, 18 वर्षीय विश्वाचा रि-भोई जिल्ह्यातील नॉन्गपोह सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाताना मृत्यू झाला, तर इतर खेळाडू आता पूर्वोत्तर इंदिरा गांधी प्रादेशिक आरोग्य आणि वैद्यकीय संस्था आणि विज्ञान संस्थेत भरती आहेत. सर्वजण धोक्याबाहेर आहेत. एमटीटीएचे उपाध्यक्ष ब्रूस पी मारक ( MTTA Vice president Bruce P. Marak ) आणि सरचिटणीस चिरंजीब चौधरी ( General Secretary Chiranjeeb Chaudhary ) यांनी अतिशय प्रतिभावान आणि आश्वासक टेबल टेनिसपटू विश्व यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

विश्वाने देश-विदेशात अनेक विजेतेपदे जिंकली होती: एमटीटीएने सांगितले की डी विश्वाने देश-विदेशात अनेक ज्युनियर, सब-ज्युनियर आणि कॅडेट पदके जिंकली आहेत आणि त्याचा मृत्यू हा भारतातील खेळासाठी मोठा धक्का आहे. विश्वाचे कुटुंबीय नोंगपोह येथे पोहोचणार आहेत, जिथे त्याचा मृतदेह ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा -Danish Open : वेदांत माधवनने डॅनिश ओपन जलतरण स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.