मुंबई - क्रीडा क्षेत्रातून एक दु: खद बातमी आली आहे. स्वित्झर्लंडचे दिग्गज आईस हॉकीपटू रॉजर चॅप्पोट यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी स्वित्झर्लंडकडून १०० हून अधिक सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहेत. ते ७९ वर्षांचे होते.
आंतरराष्ट्रीय आईस हॉकी महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, रॉजर यांच्यावर मागील दोन आवड्यांपासून रूग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर ते घरी परतले आणि एक एप्रिलला त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे आतापर्यंत चार खेळाडूंना प्राण गमवावे लागले आहेत. त्यात रॉजर यांच्या रुपाने आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. रॉजर हे स्वित्झर्लंडचे महान खेळाडू होते. त्यांनी ६०चे दशक यांनी चांगलेच गाजवले होते.
कोरोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होताना दिसत आहे. जगभरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा १४ लाख पार झाला आहे. तर मृतांचा आकडा ८२,०९६ इतका झाला आहे. आतापर्यंत ३ लाख ०२,२०९ रुग्ण बरे झाले आहेत. भारतात ५ हजाराहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे.
हेही वाचा - देशासाठी काय पण! कोरोना विरूद्धच्या लढ्यासाठी १५ वर्षीय खेळाडूने उचलले 'हे' पाऊल
हेही वाचा - विराटच्या वर्चस्वाला धक्का देत बेन स्टोक्स बनला 'जगातील सर्वोत्तम खेळाडू'