नवी दिल्ली : जगात अनेक क्रीडा स्पर्धा होत असतात. या खेळांमध्ये अनेक खेळाडूही भाग घेतात. खेळाबद्दल बोलायचे झाले तर क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, व्हॉलीबॉल, हॉकी, बॅडमिंटन, बेसबॉल या खेळांचे नाव प्रत्येकाच्या ओठावर येते. पण स्वीडनने कामक्रीडेला चक्क इतर खेळांच्या प्रमाणेच क्रीडा दर्जा देण्याची घोषणा केल्याची बातमी आली आहे. याबद्दल जाणून तुम्हाला धक्का बसेल. सर्वसाधारण खेळात असा खेळ यापूर्वी कधीच खेळला गेला नव्हता. आता स्वीडनही या नव्या खेळाच्या स्पर्धेचे आयोजन करणार आहे, असेही या बातमीत म्हटले आहे. मात्र सेक्सला खेळाचा दर्जा अजूनही देण्यात आला नसल्याचे स्वीडनच्या नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशनने स्पष्ट केले आहे.
सेक्सला खेळाचा दर्जा ? - स्वीडनने आपल्या देशात सेक्सला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली या वृत्ताने सगळ्या क्रीडा जगतात खळबळ माजली. यासह स्वीडन हा सेक्सला खेळ म्हणून मान्यता देणारा जगातील पहिला देश ठरला आहे, अशीही आवई उठली. एका अहवालानुसार, स्वीडनने आपल्या देशात सेक्स हा खेळ म्हणून आधीच नोंदणी केली आहे, असेही सांगण्यात आले. याशिवाय स्वीडन 8 जूनपासून युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे, अशीही माहिती मिळत होती. या लैंगिक क्रीडा स्पर्धेत सुमारे 20 देशांतील स्पर्धक सहभागी होणार असल्याचेही वृत्त होते. मात्र यासंदर्भात स्वीडनच्या नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशनने कोणतीही पुष्टी केलेली नाही.
८ जूनपासून सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन - सेक्स चॅम्पियनशिपच्या नियमांनुसार स्वीडनमध्ये ८ जूनपासून सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही या बातमीत म्हटले आहे. ही स्पर्धा अनेक आठवडे चालणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी 20 देशांतील लोकांनी आपली नावे नोंदवली आहेत, असेही सांगण्यात आले होते. स्वीडन सेक्स फेडरेशनतर्फे याचे आयोजन करण्यात येणार आहे, असे या बातमीत म्हटले आहे. मात्र स्वीडनच्या राष्ट्रीय क्रीडा महासंघाने याची पुष्टी केलेली नाही.
स्वीडन नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशनची भूमिका - स्वीडनच्या राष्ट्रीय क्रीडा महासंघानुसार अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांच्याकडे आला होता. मात्र या प्रस्तावामधील निकष आणि इतर गोष्टीतून क्रीडा संबंधित अनेक बाबींची पूर्तता होत नाही असे दिसून आले. त्यामुळे या प्रस्तावामध्ये सुधारणा करण्याची सूचना करण्यात आली होती. या सूचनांच्या नुसार पुन्हा प्रस्ताव आला तर फेडरेशन काय भूमिका घेणार याबाबत मात्र फेडरेशनने मौन बाळगले आहे. त्यामुळे येत्या काळात जर निकष पाळून प्रस्ताव दाखल केला गेला तर तो दिवस दूर नसेल की सेक्सलाही खेळाचा दर्जा मिळेल.
हेही वाचा -