नवी दिल्ली - देशातील क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने क्रीडा मंत्रालयाने रविवारी नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जाहीर केली आहे. या एसओपीनुसार, आऊटडोअर खेळांसाठी मैदानावरील एकूण कमाल क्षमतेपैकी जास्तीत जास्त ५० टक्के जागा प्रेक्षकांसाठी ठेवण्यात येईल.
हेही वाचा - AUS vs IND : भारताचा पहिला डाव आटोपला, शतकवीर रहाणे धावबाद
कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून देशांतर्गत क्रीडास्पर्धांना लगाम घालण्यात आला होता. मात्र, आता प्रेक्षकांना या स्पर्धांचा आनंद घेता येणार आहे. २५ नोव्हेंबरला दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रेक्षकांचे व्यवस्थापन केले जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. गृह मंत्रालयाने इनडोअर खेळांसाठी २०० दर्शकांची मर्यादा निश्चित केली आहे. तसेच, राज्य सरकारांना स्वत: चे दर्शकत्व निश्चित करण्याचीही परवानगी मंत्रालयाने दिली आहे.