ETV Bharat / sports

Korea Open: भारताच्या 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा - Badminton News

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ( Badminton player Lakshya Sen ) आणि दोन ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू ( Olympic medalist PV Sindhu ) मंगळवारपासून सुरू होणाऱ्या कोरिया ओपन सुपर 500 स्पर्धेत भारतीय आव्हानाचे नेतृत्व करतील.

PV Sindhu
PV Sindhu
author img

By

Published : Apr 4, 2022, 8:47 PM IST

सनचेऑन (कोरिया): जर्मन ओपन आणि ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचलेला लक्ष्य सेन ( Badminton player Lakshya Sen) उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. पहिल्या फेरीत त्याचा सामना चीनचा जागतिक क्रमवारीत 25व्या क्रमांकावर असलेल्या लू गुआंग जूशी ( Lu Guang Xu ) होणार आहे. सेनसाठी मात्र विजेतेपद पटकावणे सोपे असणार नाही.

कारण पुरुष एकेरीच्या ड्रॉमध्ये इंडोनेशियाचा अँथनी गिंटिंग ( Indonesia Anthony Ginting ) (अव्वल मानांकित) आणि जोनाथन क्रिस्टी (तिसरा मानांकित), जगज्जेता आणि चौथा मानांकित लोह केन य्यू, मलेशियाचा द्वितीय मानांकित ली जी जिया आणि थायलंडचा कुनलावत विटिडसार्न असे काही बलाढ्य खेळाडू सहभागी होत आहेत. या मोसमात सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनमध्ये दोन विजेतेपदे जिंकणारी सिंधू अमेरिकेच्या लॉरेन लॅम ( American Lauren Lam ) विरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्याचा पुढचा सामना अया ओहोरीशी होऊ शकतो. तर दोन विजयानंतर तिचा सामना थायलंडच्या सुपानिडा कातेथोंग किंवा बुसानन ओंगबामरुंगफानशी होऊ शकतो.

लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना नेहवालला गेल्या दीड वर्षांपासून फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. येथे पहिल्या फेरीत तिचा सामना जपानच्या असुका ताकाहाशीशी होणार आहे. स्विस ओपनचा अंतिम फेरीतला एचएस प्रणॉय पुरुष एकेरीत मलेशियाच्या चीम जून वेईविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. तर जागतिक चॅम्पियनशिपमधील रौप्यपदक विजेता आणि पाचव्या मानांकित किदाम्बी श्रीकांतची ( Kidambi Srikanth ) पहिल्या फेरीत मलेशियाच्या लिऊ डॅरेनशी लढत होईल. आणखी एक खेळाडू किरण जॉर्जचा सामना कोरियाच्या ली डोंग क्यूनशी होणार आहे.

महिला एकेरीत सय्यद मोदी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या मालविका बनसोडचा सामना हान यूशी होणार आहे. श्रीकृष्ण प्रिया कुदारावल्लीला पहिल्या फेरीत द्वितीय मानांकित कोरियन एन सेयांगचे कडवे आव्हान असेल. भारताची नजर दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ( Satviksairaj Rankireddy and Chirag Shetty ) या तृतीय मानांकित पुरुष जोडीवर असेल. एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला पुरुष दुहेरीत, बी सुमित रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा मिश्र दुहेरीत आणि एन सिक्की रेड्डी आणि अश्विनी महिला दुहेरीत आव्हान देतील.

हेही वाचा - Miami Open Title : कार्लोस अल्कराझ मियामी ओपनचा विजेता, जगातील सर्वात तरुण खेळाडू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.