नवी दिल्ली - आयटीटीएफ वर्ल्ड टूर हंगरी ओपन स्पर्धेत जी. सॅथियान आणि शरथ कमल या भारतीय जोडीला रौप्य पदकासाठी समाधान मानावे लागले. या स्पर्धेच्या दुहेरीतील अंतिम सामन्यात भारतीय जोडीला जर्मनीच्या बेनेडिक्ट ड्यूडा आणि पॅट्रिक फ्रान्झिस्का यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा - भारतीय फुटबॉल संघाचे माजी खेळाडू अशोक चॅटर्जी यांचे निधन
शनिवारी झालेल्या सामन्यात भारतीय जोडीला ५-११, ९-११, ११-८, ९-११ असा पराभव पत्करावा लागला. जगातील २७ व्या क्रमांकावर असलेल्या या भारतीय जोडीने वर्ल्ड टूर स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश केला होता.