लीमा (पेरू) - मनु भाकेरच्या नेतृत्वात भारताने आयएसएसएफ ज्यूनियर विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेच्या पदकतालिकेत अव्वलस्थान काबीज केले. भारताने 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धांमध्ये क्लीन स्वीप केलं. यात मिश्र, महिला आणि पुरूष संघाचा समावेश आहे. याशिवाय भारताच्या 10 मीटर रायफल संघाने देखील सुवर्ण कामगिरी केली. भारताच्या नावे आता सहा सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कास्य पदक आहेत.
अमेरिकेने चार सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कास्य पदक जिंकली असून ते दुसऱ्या स्थानी आहेत. मनु भाकेरने एकाच दिवशी दोन सुवर्ण पदके जिंकली. यासह त्याची सुवर्णपदकाची संख्या 3 झाली आहे. तिने सरबजोत सिंहसोबत मिश्र संघात खेळताना सुवर्ण जिंकले. यानंतर तिने रिदम सांगवान आणि शिखा नारवाल सोबत खेळताना 10 मीटर एअर पिस्तूल महिला संघाच्या गटात सुवर्ण वेध घेतला. भारताने सुवर्ण पदकासाठीच्या सामन्यात बेलारूचा 16-12 ने पराभव केला. नविन, सरबजोत सिंह आणि शिव नारवाल या पुरूष संघाने बेलारूसचा 16-14 ने पराभव करत सुवर्ण जिंकले.
नॅशनल रायफल असोशिएशन ऑफ इंडियाने एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, मनुने आणखी दोन सुवर्ण पदके जिंकली. ज्यामुळे भारताला फायदा झाला. त्याची पदक संख्या 3 झाली आहे. सरबजोत सिंहसोबत एअर पिस्तूल मिश्र मध्ये तिने सुवर्ण जिंकल्यानंतर 10 मीटर महिला गटात रिदम सांगवान आणि शिखा नारवाल सोबत तिने सुवर्ण जिंकले.
हेही वाचा - RCB VS PBKS : बंगळुरूचे पंजाबसमोर 165 धावांचे आव्हान; मॅक्सवेलची वादळी खेळी
हेही वाचा - RCB VS PBKS : पंजाबचा फाडशा पाडत बंगळुरू प्ले ऑफ फेरीत