ETV Bharat / sports

शरथ कमल ठरला भारताचा अव्वल टेटेपटू

गेल्या महिन्यात शरथने ओमान ओपनमध्ये जेतेपद जिंकले होते. वरिष्ठ पुरुष रँकिंगमध्ये त्याला सात स्थानांचा फायदा झाला होता. “ही एक चांगली  बातमी आहे. नकारात्मक परिस्थितीत चांगली वार्ता मिळाली”, असे शरथने सांगितले.

Sharath Kamal becomes India's highest-ranked table tennis player
शरथ कमल ठरला भारताचा अव्वल टेटेपटू
author img

By

Published : Apr 17, 2020, 4:40 PM IST

नवी दिल्ली - गुरुवारी जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या (आयटीटीएफ) ताज्या क्रमवारीत भारताच्या शरथ कमलने ३१ वे स्थान गाठले आहे. या क्रमवारीमुळे तो भारताचा अव्वल क्रमांकाचा टेटेपटू ठरला आहे.

गेल्या महिन्यात शरथने ओमान ओपनमध्ये जेतेपद जिंकले होते. वरिष्ठ पुरुष रँकिंगमध्ये त्याला सात स्थानांचा फायदा झाला होता. “ही एक चांगली बातमी आहे. नकारात्मक परिस्थितीत चांगली वार्ता मिळाली”, असे शरथने सांगितले.

युवा खेळाडू मुकुल दानीनेही क्रमवारीत चांगले यश मिळवून टॉप-२००मध्ये स्थान मिळवले आहे. त्याने नऊ स्थानांची झेप घेत २००वे स्थान मिळवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.