ETV Bharat / sports

Wimbledon 2022 : सेरेना विल्यम्सला मोठा धक्का, पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर

सेरेना विल्यम्सला विम्बल्डनमध्ये पहिल्याच सामन्यात मोठा धक्का बसला आहे. पहिल्याच फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला. विम्बल्डनमध्ये पुन्हा पदार्पण करणाऱ्या सेरेनाचा जागतिक क्रमवारीत 115व्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूने पराभव केला ( Serena Williams at Wimbledon ) .

Serena Williams
Serena Williams
author img

By

Published : Jun 29, 2022, 3:54 PM IST

विम्बल्डन: माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली सेरेना विल्यम्स विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभूत ( Serena Williams loses 1st match ) झाली. तिला फ्रान्सच्या हार्मनी टॅनने पराभूत केले. ज्यामुळे सेरेना स्पर्धेबाहेर पडली. 40 वर्षीय सेरेनाने 364 दिवसांनंतर महिला एकेरीच्या सामन्यात पुनरागमन केले होते.

सेरेनाच्या खेळात बरेच चढ-उतार होते. काहीवेळा तिला असे वाटत होते की ती बाहेर आहे, तर अनेक प्रसंगी ती तिच्या 23 व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या मोहिमेसाठी पुढे जाईल असे खेळली. सेरेनाने तिचा शेवटचा एकेरी सामना गेल्या वर्षी 29 जून रोजी विम्बल्डनमध्ये खेळला होता, पण पहिल्या सेटमध्येच दुखापतीमुळे ती बाहेर पडली होती.

विम्बल्डनमध्ये सात वेळची माजी चॅम्पियन सेरेनाने जिंकून दोन गुण गाठले. तिने अखेरीस फ्रान्सच्या हार्मनी टॅनविरुद्धच्या पहिल्या फेरीच्या लढतीत 7-5, 1-6, 7-6 (10-7) असा पराभव पत्करावा ( Serena Williams loses to Harmony Tan ) लागला. ज्यामुळे जागतिक क्रमवारीत 115 व्या स्थानावर असलेल्आ हार्मनी टॅनचे विम्बल्डनमध्ये शानदार सुरुवात केली.

गुरुवारी दुसऱ्या फेरीत टॅनचा सामना 32व्या मानांकित स्पेनच्या सारा सोरिबेस टोर्मोशी होईल, जिने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या पात्रता खेळाडू क्रिस्टीना मॅकहेलचा 6-2, 6-1 असा पराभव केला.

हेही वाचा - IRE vs IND 2nd T20 : दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा आयर्लंडवर 4 धावांनी विजय, हुड्डाचे शतक तर सॅमसनचे वादळी अर्धशतक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.