ETV Bharat / sports

साताऱ्याचे तब्बल ११ बास्केटबॉल खेळाडू राज्य संघात

कुणाल शिराळे, ध्रुव निकम, अथर्व परदेशी, ईफा इनामदार, ईश्वरी कुंभार, सिद्धी शिंदे, यशराजराजे महाडिक, तेजराज मांढरे, विवेक बडेकर, दिप अवकिरकर आणि सिद्धी बादापुरे अशी निवड झालेल्या खेळाडूंची नावे आहेत. हे सर्व खेळाडू रणजीत अकादमीत बास्केटबॉलचे धडे गिरवत आहेत.

satara 11 basketball player selected by maharashtra state team
साताऱ्याचे तब्बल ११ बास्केटबॉल खेळाडू राज्य संघात
author img

By

Published : Dec 21, 2019, 4:13 PM IST

सातारा - येथील ११ बास्केटबॉल खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. पाँडेचेरी, दिल्ली आणि छत्तीसगड येथील राष्ट्रीय स्पर्धेकरिता हे खेळाडू महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत.

कुणाल शिराळे, ध्रुव निकम, अथर्व परदेशी, ईफा इनामदार, ईश्वरी कुंभार, सिद्धी शिंदे, यशराजराजे महाडिक, तेजराज मांढरे, विवेक बडेकर, दिप अवकिरकर आणि सिद्धी बादापुरे अशी निवड झालेल्या खेळाडूंची नावे आहेत. हे सर्व खेळाडू रणजीत अकादमीत बास्केटबॉलचे धडे गिरवत आहेत.

अकलूज आणि सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत १४ व १९ वर्षांखालील वयोगटात रणजीत अकादमीच्या सातारा इंग्लिश मिडीयम स्कूलमधील मुलांच्या संघांनी कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करताना दोन विजेतेपदे पटकावली. तर मुलींच्या गटात उपविजेतेपद मिळवले होते.

हेही वाचा - ६३ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा : माऊली जमदाडे, अक्षय मंगवडे करणार सोलापूरचं प्रतिनिधित्व

हेही वाचा - कुस्तीप्रेमींसाठी खुशखबर..! ६३ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा पुण्यात

Intro:सातारा : साता-यातील (कै.) रणजित गुजर बास्केटबॉल अकादमीचे एकाच वेळी एक-दोन नव्हे ... तब्बल 11 खेळाडू देशभरात विविध ठिकाणी होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धांतून चमकत आहेत. यातील यश राजेमहाडिक 19 वर्षांखालील मुलांच्या संघाचे नेतृत्व करत अाहे. साता-यातील रणजीत बास्केटबॉल अकादमीची अवघ्या 3 वर्षांतील वाटचाल जितकी दैदिप्यमान आहे, तितकीच ती रोमांचकारी !Body:सातारा म्हटलं की आठवतो अजिंक्यतारा किल्ला, कंदी पेढा आणि अलीकडे अलीकडे कास पठार ... परंतू आणखी एक गोष्ट सातारा या नावाला अनंत काळापासून जोडली आहे, ती म्हणजे बास्केटबॉल ! (कै.) रणजीत गुजर यांनी साधारण 35 वर्षांपुर्वी साता-याला बास्केटबॉल या खेळाची अोळख करुन दिली. नंतर हा खेळ त्यांनी परिश्रमपूर्वक जोपासला, रुजवला अन् वाढवला. 1991 मध्ये बार्शी येथून स्पर्धा संपवुन येत असताना दुर्दैवी अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बास्केटबॉलचे राष्ट्रीय प्रशिक्षक रोहन गुजर वडीलांचा वारसा पुढे चालवत आहेत. साता-यात 2016 मध्ये रणजीत गुजर यांच्या नावाने बास्केटबॉल अकादमी सुरु झाली. आज गुरुवार पेठेतील शिर्के मैदानाच्या कोर्टवर अनेक मुले-मुली या अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत.

अकलूज व सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत 14 व 19 वर्षांखालील वयोगटात रणजीत अकादमीच्या सातारा इंग्लिश मिडीयम स्कूलमधील मुलांच्या संघांनी कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करताना दोन विजेतेपदे पटकावली. तर मुलींच्या गटात उपविजेतेपद मिळवले होते.

अकादमीचे कुणाल शिराळे, ध्रुव निकम, अथर्व परदेशी, ईफा इनामदार, ईश्वरी कुंभार, सिद्धी शिंदे, यशराज राजेमहाडिक, तेजराज मांढरे, विवेक बडेकर, दिप अवकिरकर व सिद्धी बादापुरे या तब्बल ११ खेळाडूंची पाँडेचेरी, दिल्ली व छत्तीसगड येथील
राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाली. कदाचित राज्यातील हा आगळावेगळा विक्रम मानावा लागेल. विशेष म्हणजे यशराज राजेमहाडिक याने १९ वर्षांखालील गटात दुस-यांदा महाराष्ट्राचे कप्तानपद भूषवत चमकदार कामगिरी केली.

ही मुलं राष्ट्रीय प्रशिक्षक रोहन गुजर यांच्या रणजीत अकादमीत बास्केटबॉलचे धडे गिरवत आहेत. अकादमीविषयी सांगताना रोहन गुजर म्हणाले, "बास्केटबॉल खेळाचा प्रसार व्हावा, खेळात मुलांचे करिअर घडावे या हेतूने अकादमीची मुहूर्तमेढ रोवली. आमच्याकडे सध्या ४ वर्षांवरील विद्यार्थी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत रोजचा सराव करतात. आमच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक सामन्यांचा जास्तीतजास्त अनुभव मिळावा म्हणून आम्हीं पुणे, मुंबई सारख्या महानगरांमध्ये होणा-या स्पर्धांतून अकादमीचे संघ खेळवतो. या खेळाडूंचा पोषणआहार, सांघिक भावना व एकाग्रता विकास या बाबींवर आम्हीं विशेष लक्ष देतो."

रोहन गुजर यांच्या बरोबरच आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अर्निका गुजर - पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या व सातारा इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका मिथीला गुजर, राष्ट्रीय खेळाडू जिज्ञासा गुजर हे प्रशिक्षक साता-याच्या मातीत राष्ट्रीय- अांतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत यासाठी मेहनत घेत आहेत.

कॅप्शन -
सातारा : राज्य संघात निवड झालेल्या
रणजीत अकादमीच्या 11 यशवंत-गुणवंत खेळाडूंसमवेत त्यांचे प्रशिक्षक रोहन व जिज्ञासा गुजर.

--------------------Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.