पुणे : माजी आशिया-पॅसिफीक रॅली विजेता संजय टकले ( Former Asia Pacific Rally Winner Sanjay Takle ) दुसऱ्या जागतिक मोटर स्पोर्ट्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व ( Sanjay Takale in Indian Team for World Motor Sports ) करणार आहे. फ्रान्समधील ( Sanjay Name was Recommended by FMSCI ) मार्से येथील पोल रिका सर्कीटवर २६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान ही स्पर्धा होईल. ( Sanjay Takle will Represent India in Second World Motor Sports ) या स्पर्धेसाठी संजय टकले हे भारताचे प्रतिनिधित्व ( FMSCI India Official National Apex Apply to FIA ) करणार आहेत.
संजय यांच्या नावाची शिफारस एफएमएससीआय या अधिकृत संस्थेकडून करण्यात आली : संजय यांच्या नावाची शिफारस एफएमएससीआय (फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब्ज ऑफ इंडिया) या भारतातील अधिकृत राष्ट्रीय शिखर संघटनेने एफआयए (फेडरेशन इंटरनॅशनली डी ऑटोमोबील) या जागतिक संघटनेकडे केली. कोरोनामुळे गेली दोन वर्षे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. पोल रिका सर्कीटवर अनेक वर्षांपासून फ्रेंच ग्रांप्री फॉर्म्युला वन शर्यतीचे आयोजन केले जाते. ल कॅस्टेलेट या गावात १९६९ मध्ये हे सर्कीट बांधण्यात आले आहे.
जागतिक स्पर्धेत मी देशाचे प्रथमच प्रतिनिधीत्व करणार : जागतिक स्पर्धेत मी देशाचे प्रथमच प्रतिनिधीत्व करणार आहे. त्यामुळे ही संधी अत्यंत खास आहे. या महोत्सवात प्रत्येक स्पर्धक आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करतो. त्याला राष्ट्रध्वजासाठी कौशल्य आणि क्षमता पणास लावण्याची संधी मिळते. माझ्या आजवरच्या कारकिर्दीतील हा अभिमानस्पद क्षण असेल. त्यामुळे फ्रान्समध्ये भारताचे, तिरंग्याचे प्रतिनिधीत्व करण्यास मी आतूर आहे, असे यावेळी टकले यांनी सांगितले.
देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दुर्मिळ : पुणेस्थित संजयने यापूर्वी आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेत (एपीआरसी) भाग घेतला आहे. मोटर स्पोर्ट्समध्ये बहुतांश प्रकारांमध्ये स्पर्धक संघाचे प्रतिनिधीत्व करतो अथवा वैयक्तिक स्वरूपात भाग घेतो. त्यामुळे देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दुर्मिळ मानली जाते. संजयला मुंबईस्थित एअरस्पेस या कंपनीचे पाठबळ लाभले आहे. ड्रोनवर आधारित पायाभूत वाहतूक यंत्रणा क्षेत्रातील ही कंपनी आहे. जी २०१९ मध्ये युवा उद्योजकांनी स्थापन केली. ही कंपनी एका स्वप्नवत प्रकल्पावर काम करीत आहे. शहरांतर्गत वाहतूक ड्रोन तंत्रज्ञानाने अधिक स्मार्ट आणि शाश्वत पद्धतीने करण्यासाठी जगाला प्रेरित करण्याची त्यांची ध्येयदृष्टी आहे.
एफएमएससीआयने आधीच्या कामगिरीवर संजयचे नाव मंजूर : एफएमएससीआयने आधीच्या कामगिरीवर संजयचे नाव मंजूर केले. रॅलीमध्ये पुनरागमनासाठी संजय प्रयत्नशील आहे. सहभाग निश्चित झाल्यानंतर संजयला नॅव्हीगेटरची निवड करणे आवश्यक होते. या स्पर्धेच्या नियमानुसार ड्रायव्हरला दुसऱ्या देशाच्याही नॅव्हीगेटरची निवड करता येते. संघ मात्र ड्रायव्हर ज्या देशाचा आहे त्याच देशाचा मानला जातो.
संजय यांच्याकडून नॅव्हीगेटर म्हणून न्यूझीलंडचे माईक यंग : संजयने न्यूझीलंडच्या माईक यंग याची निवड केली. संजयने एपीआरसी तसेच क्रॉस कंट्री रॅलीसाठी भारताचा मुसा शरीफ आणि मलेशियाचा शॉन ग्रेगरी यांच्या साथीत भाग घेतला आहे. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियास्थित यंगची निवड केली. याविषयी संजयने सांगितले की, नॅव्हीगेटर म्हणून कुणाची निवड करावी याबद्दल मी थोडा विचार केला. याचे कारण यंगने विविध आंतरराष्ट्रीय सर्कीटवर रेसिंग केले आहे.
एफआयए मोटरस्पोर्ट्स क्रीडा महोत्सव : तो स्वतः कुशल रॅली ड्रायव्हर आहे. एफआयए मोटरस्पोर्ट्स क्रीडा महोत्सव ही रेसिंगची एक आगळीवेगळी बहुविध स्पर्धा आहे. यामध्ये स्पर्धकांना आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळते. यंदाच्या वर्षी एफआयए महोत्सवाच्या दुसऱ्या अध्यायाचे आयोजन करेल, ज्याचे स्वरूप विस्तारित असेल. अतिरिक्त उपक्रमांमुळे स्पर्धेची व्याप्ती वाढलेली असेल. प्रत्येक विभागानुसार एकेरी प्रवेशिका सादर करून स्पर्धक देशाचे प्रतिनिधीत्व करू शकतील. प्रत्येक विभागात पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे सुवर्णपदक, रौप्यपदक आणि ब्राँझपदक दिले जाईल. त्यातून पदकतक्त्यामधील स्थान नक्की होईल. हाच सर्वसाधारण विजेत्याचा निकष असेल. विजेत्याला एफआयए मोटरस्पोर्ट गेम्स करंडक प्रदान केला जाईल.