मुंबई - भारताचा जलतरणपटू साजन प्रकाश याने शनिवारी इतिहास रचला. सेटे कॉली ट्रॉफी ही स्पर्धा रोममध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत साजन याने पुरूषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १ मिनिट ५६.३८ सेकंदाची वेळ घेत टोकियो ऑलिम्पिकचे तिकिट मिळवले. ऑलिम्पिक पात्रतेचे 'अ' निकष गाठणारा तो भारताचा पहिला जलतरणपटू ठरला.
पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात अ निकष मिळवण्यासाठी २०० मीटरचे अंतर १:५६.४८ मिनिटांत पूर्ण करणे गरजेचे होते. तेव्हा साजनने हे अंतर १:५६.३८ मिनिटांत गाठले. साजनने ०.१० सेकंदापूर्वीच ही कामगिरी केली.
साजनमुळे श्रीहरी नटराजचे ऑलिम्पिक स्वप्न धूळीस -
साजनने सेटे कॉली ट्रॉफी स्पर्धेच्या २०० मीटर बटरलफ्लाय प्रकारात अ निकष मिळवले. याच प्रकारातून भारताचा दुसरा जलतरणपटू श्रीहरी नटराज देखील सहभागी होता. परंतु, साजनने अ निकष मिळवल्याने श्रीहरी नटराजचे ऑलिम्पिकचे स्वप्न धुळीस मिळाले. त्याआधी पुरुषांच्या १०० मीटर बटरस्ट्रोक प्रकारात नटराजला शुक्रवारी ०.५ सेकंदाने पात्रतेचे 'अ' निकष मिळवण्यात अपयश होते.
भारतीय जलतरणपटूंनी यापूर्वी अनेक ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. परंतु कोणत्याही जलतरणपटूला थेट 'अ' निकषासह थेट ऑलिम्पिकचे तिकिट मिळवता आलेले नव्हते. पण साजनने ही कामगिरी करत आपल्या नावे विक्रम नोंदवला.
हेही वाचा - काइल जेमिसनविषयी सचिन तेंडुलकरचे मोठं भाकित, म्हणाला, हा तर...
हेही वाचा - IND VS ENG : मायकल वॉनने आपल्याच संघाचे टोचले कान, म्हणाला...