ETV Bharat / sports

धावपटू ते नायब तहसीलदार!...वाचा दत्ता बोरसेचा संघर्षमय प्रवास - दत्ता बोरसेचा संघर्षमय प्रवास न्यूज

दत्ता बोरसे याने कठोर परिश्रम घेत जिल्हा स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारत 7 पदके जिंकली. या यशानंतर त्याने जनसेवेचा ध्यास घेत एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. वारंवार येणाऱ्या अपयशानंतर न डगमगता तिसऱ्या प्रयत्नात दत्ताने यशाला गवसली घातली आणि खेळाडू कोट्यातून नायब तहसीलदार होण्याचा मान मिळवला.

runner to nayab tahsildar datta borse struggling journey
धावपटू ते नायब तहसीलदार!...वाचा दत्ता बोरसेचा संघर्षमय प्रवास
author img

By

Published : Jun 20, 2020, 4:22 PM IST

Updated : Jun 21, 2020, 8:10 PM IST

नाशिक - जीवनात संघर्ष असला तर यश तुमच्या हातात असते, हे वाक्य राष्ट्रीय धावपटू असलेल्या दत्ता बोरसे याने खरे करून दाखवले. नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी निकालामध्ये दत्ता बोरसेने नायब तहसीलदार होण्याचा मान मिळवला. पेठ या आदिवासी भागातून त्याने आपल्या संघर्षमय जीवनाला सुरुवात केली.

दत्ता बोरसे याने कठोर परिश्रम घेत जिल्हा स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारत 7 पदके जिंकली. या यशानंतर त्याने जनसेवेचा ध्यास घेत एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. वारंवार येणाऱ्या अपयशानंतर न डगमगता तिसऱ्या प्रयत्नात दत्ताने यशाला गवसली घातली आणि खेळाडू कोट्यातून नायब तहसीलदार होण्याचा मान मिळवला.

धावपटू ते नायब तहसीलदार!

दत्ताची घरची परिस्थिती -

नाशिक जिल्ह्यातील पेठ या आदिवासी भागातून दत्ता बोरसेने आपल्या जीवनप्रवासाला सुरूवात केली. परिस्थिती बिकट असल्याने कामाच्या शोधात दत्ताचे कुटुंब नाशिकला गेले. शहरात आल्यावर दत्ताचे वडील रखवालदारी करू लागले तरी आई दुसऱ्याच्या घरात घरकाम करू लागली. दत्तासुद्धा एकीकडे आपले शिक्षण पूर्ण करत असताना धावण्याचा सराव करू लागला. अपार मेहनतीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केले. अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत त्याने 4 सुवर्णपदके, 1 रौप्य आणि 2 कांस्यपदके पटकावली. इतकेच नव्हे तर तो जागतिक विद्यापीठ स्पर्धेतही पात्र ठरला. मात्र, काही तांत्रिक अडचणी मुळे तो स्पर्धा खेळू शकला नाही.

खडतर संघर्षाची अखेर -

दत्ताने आपल्या प्रवासाचे वर्णन केले. तो म्हणाला, ''एकीकडे मी धावण्याचा सराव करत होतो. यात मी यशस्वी होत राहिलो. ऑलिम्पिक खेळावे असे मला वाटत होते. मात्र ते स्वप्न पूर होऊ शकले नाही. मात्र दुसरीकडे प्रशासकीय सेवेत जावे हे मनापासून वाटत होते. मी मनात जिद्द निर्माण केली आणि अभ्यासाला सुरवात केली. तीन वर्षे मी सलग एमपीएससीची परीक्षा दिली. मात्र यश दोन वेळा थोडक्यात हुकले. मात्र तिसऱ्या वर्षात मी यश संपादन केले. मी इतर मुलांना एवढंच सांगेन की संयम आणि कष्ट केले तर आयुष्यात कुठलीच गोष्ट अवघड नाही.''

दत्ताचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग म्हणाले, ''2010 मध्ये दत्ता बोरसे माझ्या संपर्कात आला. त्याची घराची परिस्थिती बिकट होती. मी त्याची गुणवत्ता ओळखली आणि त्याला मार्गदर्शन केले. तो धावपटू स्पर्धेत राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला. यात त्याची जिद्द आणि मेहनत आहे. त्याने अनेक राष्ट्रीय स्पर्धेत नाव लौकिक केले. त्याचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न होते. मात्र तो पूर्ण करू शकला नाही. मात्र आज तो नायब तहसीलदार झाला याचा मला अभिमान आहे. हे वर्ष नाशिकच्या खेळाडूंसाठी सुवर्णवर्ष असून आतापर्यंत खेळाडू कोट्यातून 8 खेळाडू प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहे.''

Last Updated : Jun 21, 2020, 8:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.