ETV Bharat / sports

R. Ashwin New Record : आर अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्यात मोडणार कुंबळेचा रेकाॅर्ड; नवीन विक्रमाची होणार नोंद - Kumbles Record in Second Test Match

भारताचा स्टार गोलंदाज आर अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये १०० बळी घेण्यापासून अवघ्या काही विकेट्स दूर आहे. यापूर्वी माजी गोलंदाज अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 111 विकेट घेतल्या आहेत. अशा स्थितीत अश्विनची दिल्ली कसोटीतील कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यामध्ये त्याने जर सर्वाधिक विकेट घेतल्या तर तो नवीन विक्रम स्वतःच्या नावावर करणार आहे.

Ravichandran Ashwin to Break Kumbles Record in Second Test Match; A New Record will be Recorded
आर अश्विन दुसऱ्या कसोटी सामन्यात मोडणार कुंबळेचा रेकाॅर्ड; नवीन विक्रमची होणार नोंद
author img

By

Published : Feb 14, 2023, 7:22 PM IST

नवी दिल्ली : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना खिंडार पाडणारा भारतीय संघाचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणखी एक विक्रम करण्याच्या जवळ आला आहे. अश्विनने नागपूर सामन्याच्या दोन्ही डावांत एकूण 8 बळी (पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 5) घेतले. अशा परिस्थितीत अश्विनने दिल्ली कसोटीत आणखी 3 विकेट घेतल्यास तो कसोटी क्रिकेटमध्ये एक विशेष विक्रम करू शकणार आहे. यापूर्वी हा विक्रम माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावावर होता. यानंतर अश्विन दुसरा गोलंदाज बनला आहे.

आर अश्विनचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ कसोटी सामने : आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ कसोटी सामने खेळले असून, ३६ डावांत ९७ बळी घेतले आहेत. अशा परिस्थितीत त्याने पुढील सामन्यात 3 विकेट घेतल्यास तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 कसोटी सामन्यांच्या 38 डावांत 111 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाज हरभजन सिंगने 18 कसोटी सामन्यांच्या 35 डावांत 95 बळी घेतले. मात्र, ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम इंग्लंडच्या इयान बॉथमच्या नावावर आहे. बोथमने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 36 कसोटी सामन्यांच्या 66 डावांत 148 विकेट घेतल्या आहेत.

पहिली कसोटी भारताने 1 डाव 132 धावांनी जिंकली : विशेष म्हणजे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 ची पहिली कसोटी भारताने 1 डाव आणि 132 धावांनी जिंकली. भारताने पहिला सामना अवघ्या तीन दिवसांत जिंकला आहे. त्याचवेळी, दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. जेटली स्टेडियमवर तब्बल 5 वर्षांनंतर कसोटी सामना होणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ मालिकेत बरोबरी साधण्याच्या उद्देशाने उतरणार आहे. तर भारतीय संघाला दिल्ली कसोटी जिंकून मालिकेत आपले स्थान मजबूत करायचे आहे.

रविचंद्रन अश्विनची पहिल्या कसोटीतील कामगिरी : भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 450 बळी पूर्ण केले आहेत. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात तीन विकेट घेऊन या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने यापूर्वीच तसे अनेक विक्रम केले आहेत. आता त्याच्या नावावर हा नवीन विक्रम झाला आहे. रविचंद्रन अश्विन गुरुवारी कसोटी क्रिकेटमध्ये 450 बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने अॅलेक्स कॅरीची विकेट घेतली. ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाला बाद करून त्याने गोलंदाजी मोठा विक्रम स्वतःच्या नावावर केला.

अश्विनच्या नावावर रेकाॅर्ड : अश्विनने 89 कसोटी सामन्यांच्या 167 डावांमध्ये 450 विकेट घेतल्या आहेत. त्याने एका डावात 30 वेळा पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत आणि सात वेळा सामन्यात 10 बळी घेतले आहेत. 36 वर्षीय तामिळनाडूच्या गोलंदाजाच्या नावावर एका डावात 7/59 आणि सामन्यात 13/140 असे सर्वोत्तम रेकॉर्ड आहेत. रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 18 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 89 विकेट घेतल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच वेळा पाच बळी आणि एका सामन्यात एकदा 10 बळी घेतले आहेत. अश्विनने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते

हेही वाचा : ICC Women T20 World Cup 2023 : आज ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश एकमेकांना भिडणार; पाहुया खेळपट्टीचा खास अहवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.