नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने आपल्या फिरकीची जादू कायम ठेवत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 बळी पूर्ण केले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आज ही कामगिरी केली. यादरम्यान, रविचंद्रन अश्विनने अॅलेक्स कॅरीची विकेट घेताच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 बळी घेणारा आणखी एक खेळाडू बनला आहे. तसेच, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 हून अधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या श्रेणीत सामील झाला आहे. रविचंद्रन अश्विनने ही कामगिरी केल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आर अश्विनचेट्वीट करून अभिनंदन केले आहे.
-
Another day at office and another milestone for @ashwinravi99 👏👏
— BCCI (@BCCI) February 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Do you reckon Australia is his favourite opponent?#INDvAUS pic.twitter.com/Oxohqv9HQi
">Another day at office and another milestone for @ashwinravi99 👏👏
— BCCI (@BCCI) February 17, 2023
Do you reckon Australia is his favourite opponent?#INDvAUS pic.twitter.com/Oxohqv9HQiAnother day at office and another milestone for @ashwinravi99 👏👏
— BCCI (@BCCI) February 17, 2023
Do you reckon Australia is his favourite opponent?#INDvAUS pic.twitter.com/Oxohqv9HQi
कुंबळे भारतीय खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर : भारताचा स्टार क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने कांगारूंविरुद्ध कसोटी सामन्यात १०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत महान फिरकीपटू अनिल कुंबळेचा समावेश केला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतासाठी 20 वा सामना खेळणारा अश्विन हा कुंबळेनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 100 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. कुंबळे १११ विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.
अश्विन हा क्रिकेट विश्वातील 15 वा गोलंदाज : पाहिल्यास, 36 वर्षीय फिरकीपटू हा कसोटी सामन्यांच्या इतिहासातील 15 वा गोलंदाज आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये 100 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. इंग्लंडचा महान अष्टपैलू सर इयान बॉथम या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 36 कसोटींमध्ये त्याने 148 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद केले. त्याच्या खालोखाल वेस्ट इंडिजचा महान कोर्टनी वॉल्श (38 कसोटीत 135 बळी), इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड (35 कसोटीत 131 बळी) यांचा क्रमांक लागतो. याशिवाय इतर 11 खेळाडूंनी हा पराक्रम दाखवला आहे.
अश्विनने नागपूर कसोटीत निम्मा संघ केला गारद : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना खिंडार पाडणारा भारतीय संघाचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणखी एक विक्रम करण्याच्या जवळ आला आहे. अश्विनने नागपूर सामन्याच्या दोन्ही डावांत एकूण 8 बळी (पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 5) घेतले. अशा परिस्थितीत अश्विनने दिल्ली कसोटीत आणखी 3 विकेट घेतल्यास तो कसोटी क्रिकेटमध्ये एक विशेष विक्रम करू शकणार आहे. यापूर्वी हा विक्रम माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावावर होता. यानंतर अश्विन दुसरा गोलंदाज बनला आहे.
नवीन विक्रम केला स्वतःच्या नावावर : भारताचा स्टार गोलंदाज आर अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये १०० बळी घेण्यापासून अवघ्या काही विकेट्स दूर असताना, त्याने तीन विकेट घेऊन स्वतःच्या नावावर नवीन विक्रम केला आहे. यापूर्वी माजी गोलंदाज अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 111 विकेट घेतल्या आहेत. अशा स्थितीत अश्विनची दिल्ली कसोटीतील कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. त्याने आज 100 विकेट पूर्ण करून भारतीय संघाचा तो दुसरा गोलंदाज आहे, ज्याने 100 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये त्याने जर सर्वाधिक विकेट घेतल्या तर तो नवीन विक्रम स्वतःच्या नावावर करणार आहे.
अश्विनचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ कसोटी सामने : आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ कसोटी सामने खेळले असून, ३६ डावांत ९७ बळी घेतले आहेत. अशा परिस्थितीत त्याने पुढील सामन्यात 3 विकेट घेतल्यास तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 कसोटी सामन्यांच्या 38 डावांत 111 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाज हरभजन सिंगने 18 कसोटी सामन्यांच्या 35 डावांत 95 बळी घेतले. मात्र, ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम इंग्लंडच्या इयान बॉथमच्या नावावर आहे. बोथमने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 36 कसोटी सामन्यांच्या 66 डावांत 148 विकेट घेतल्या आहेत.