ETV Bharat / sports

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे चिरंजीव रणइंदर सिंग चौथ्यांदा रायफल संघाच्या अध्यक्षपदी विराजमान

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे सुपुत्र रणइंदर सिंग यांनी चौथ्यांदा भारतीय राष्ट्रीय रायफल संघाचे अध्यक्षपद बनले. रणइंदर सिंग यांनी मोहालीत झालेल्या निवडणूकीत बसपाचे खासदार श्याम सिंह यादव यांचा 56-3 अशा फरकाने एकतर्फा पराभव केला.

Raninder Singh re-elected NRAI president for fourth time
कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे चिरंजीव रणइंदर सिंग चौथ्यांदा रायफल संघाच्या अध्यक्षपदी
author img

By

Published : Sep 18, 2021, 8:00 PM IST

मोहाली - अनुभवी प्रशासक आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे सुपुत्र रणइंदर सिंग हे चौथ्यांदा भारतीय राष्ट्रीय रायफल संघाचे अध्यक्षपद बनले. विशेष बाब म्हणजे आजच अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर दुसरीकडे रणइंदर सिंग यांनी निवडणूक जिंकली. रणइंदर सिंग यांनी मोहालीत झालेल्या निवडणूकीत बसपाचे खासदार श्याम सिंह यादव यांचा 56-3 अशा फरकाने एकतर्फा पराभव केला. कुंवर सुल्लान यांना बिनविरोध महासचिव म्हणून निवडण्यात आले. तर रणदीप मान यांची कोषाध्यपदी वर्णी लागली.

ओडिशाचे खासदार कलीकेश नारायण सिंह देव महासंघाच्या 8 उपाध्यक्षांशिवाय अनुभवी उपाध्यक्ष म्हणून राहतील. पवन कुमार सिंह देखील शेला कानुंगो यांच्यासोबत महासंघाचे संयुक्तपणे सचिव म्हणून काम पाहतील. एनआरएआयने दिल्ली उच्च न्यायालयात यादव यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर क्रीडा मंत्रालयाने निवडणूक प्रक्रिया घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. यादव हे उत्तर प्रदेशच्या जौनपूर लोकसभा मतदारसंघाचे बहुजन समाज पार्टीचे खासदार आहे.

एनआरएआयने निवडणूक निर्धारित वेळेत घेण्याचा निर्णय यासाठी कायम राखला की, उच्च न्यायालयाकडून यावर कोणताही स्टे ऑर्डर मिळाला नव्हता. हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यावर डिसेंबरमध्ये सुनावणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये पार पडली.

क्रीडा संहितेनुसार भारतीय ऑलिम्पिक संघासह एनएसएफचे अध्यक्ष जास्ती जास्त 12 वर्षे आपल्या पदकावर राहू शकतात. याआधारावर रणइंदर सिंग यांची उमेदवारी पात्र ठरवण्यात आली. कारण 2022 च्या अखेरीस त्याचे 12 वर्ष पूर्ण होणार आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे सुपुत्र रणइंदर सिंग यांनी याआधी 2010 आणि 2017 मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत यादव याचा पराभव केला होता.

हेही वाचा - Khel Ratna : शरद कुमारसह 4 पॅरा अॅथलिटच्या नावाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

हेही वाचा -विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर कपिल देव नाराज, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.