ETV Bharat / sports

पेणमधील मुलांनी २३३ किलोमीटरचे अंतर पोहून नोंदवला विक्रम - swimming record

धरमतर ते एलिफंटा हे अंतर त्यांनी सलग सहा वेळा, ७५ तास ७ मिनिट आणि ५५ सेकंदात पार केले आणि एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावे केला. त्यांना ही कामगिरी करण्यासाठी ३ रात्र आणि ४ दिवस लागले. पोहताना त्यांना भरती-ओहोटीचा सामना करावा लागला.

raigad pen : 233 km relay swimming record set boys
पेणमधील मुलांनी २३३ किलोमीटरचे अंतर पोहून नोंदवला विक्रम
author img

By

Published : Jan 14, 2020, 11:34 AM IST

रायगड - सलग तीन रात्र व चार दिवस, खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा सामना करत सहा चिमुरड्या जलतरणपटूंनी विक्रम नोंदवला आहे. पेणमधील या जलतरणपटूंनी तब्बल २३३ किलोमीटर अंतर रिले पद्धतीने पोहून पार केले. विक्रम नोंदवल्यानंतर चिमुरड्यांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले.

भावेश कडू (वय १२), निल वैद्य (वय १२), मधुरा पाटील (वय १२), श्रवण ठाकूर (वय १४), अथर्व लोधी (वय १४) आणि सोहम पाटील (वय १३ ) असे विक्रम नोंदवलेल्या जलतरणपटूंची नावे आहेत. या चिमुरड्यांनी धरमतर बंदरावरून सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी पोहण्यासाठी सुरूवात केली.

धरमतर ते एलिफंटा हे अंतर त्यांनी सलग सहा वेळा, ७५ तास ७ मिनिट आणि ५५ सेकंदात पार केले आणि एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावे केला. त्यांना ही कामगिरी करण्यासाठी ३ रात्र आणि ४ दिवस लागले. पोहताना त्यांना भरती-ओहोटीचा सामना करावा लागला.

विद्यार्थ्यांना कोणत्याही समस्येवर मात करता यावे, यासाठी दिवसा-बरोबरच रात्री देखील समुद्रात पोहण्याचा सराव घेतला, असल्याचे प्रशिक्षक हिमांशू मलबारी यांनी सांगितले. दरम्यान, याआधी रिले पद्धतीने १६६ किलोमीटर अंतर पोहून पार करण्याचा विक्रम आहे. हा विक्रम या जलतरणपटूंनी मोडित काढत नव्या विक्रमाची नोंद केली.

पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी विक्रम नोंदवणाऱ्या जलतरणपटूंचे कौतुक केले. यावेळी अनिरुद्ध पाटील, वैकुंठ पाटील, मंगेश नेने, कुमार थत्ते, मिलिंद पाटील, हिरामण भोईर यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक नातेवाईक आणि क्रीडा रसिक उपस्थित होते.

Intro:पेणच्या सहा चिमुरड्या जलतरणपटूचां अनोखा विक्रम

तीन दिवसांत केले 233 किमी पार

रिले पद्धतीने अंतर पार करणारे ठरले देशातील पहिले विद्यार्थी

पेण-रायगड

सलग तीन रात्र व चार दिवस समुद्रातील खवळलेल्या लाटांचा, थंडीचा सामना करत पेण मधील सहा चिमुरड्या जलतरणपटूनी 233 किलोमीटर अंतर रिले पध्दतीने पोहण्याचा विक्रम केला आहे. वडखळ येथील धरमतर बंदरावर पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी या लहानग्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
भावेश कडू(12 वर्षे), निल वैद्य(12 वर्षे), मधुरा पाटील(12 वर्षे), श्रवण ठाकूर (14 वर्षे), अथर्व लोधी (14 वर्षे), सोहम पाटील (13 वर्षे) या सहा चिमुरड्यांनी धरमतर बंदरावरून सकाळी सहा वाजून 42 मिनिटांनी एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर नोंदविण्यासाठी पोहण्यास सुरुवात केली. धरमतर ते एलिफंटा हे अंतर सलग सहा वेळा 75 तास 7 मिनिट आणि 55 सेकंदात पार केले. आज सकाळी नऊ वाजून 50 मिनिटांनी 233 किलोमीटर अंतर रिले पद्धतीने पार करून एक आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे.Body:धरमतर ते एलिफंटा हे अंतर 3 रात्र आणि 4 दिवस असे सलग पार करीत असताना भरती - ओहोटीचा सामना करत, समोरून येणाऱ्या लाटांचा मारा सहन करत आणि निसर्गातील विविध पद्धतीच्या बदलांवर मात करत या चिमुरड्यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आजपर्यंत अशा प्रकारे रिले पद्धतीने 166 किलोमीटर अंतर पोहून पार करण्याचा विक्रम रचला गेला होता. मात्र आज या जलतरणपटू यांनी 233 किलोमीटरचे अंतर पार करून देशातील रिले पद्धतीने सर्वात जास्त किलोमीटर अंतर पार करण्याचा विक्रम रचला .
या लहानग्या जलतरणपटूच्या अभिमानास्पद कामगिरीबाबत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, जिल्हा परिषद माजी विरोधीपक्ष नेते वैकुंठ पाटील, मंगेश नेने , जे.एस.डब्ल्यू.स्टील कंपनीचे अधिकारी बालबुंडा, कुमार थत्ते, भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, क्रीडा क्षेत्रातील रायगड भूषण पुरस्कार विजेते हिरामण भोईर यांसह विद्यार्थ्यांचे पालक नातेवाईक आणि क्रीडा रसिक उपस्थित होते.Conclusion:( बेस्ट ऑफ इंडिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होईल अशा प्रकारची उल्लेखनीय कामगिरी या विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यांच्या या मेहनतीला दाद द्यावी तेवढी कमीच
- संतोष पाटील,आयोजक)

( सराव फार कठीण होता, कोणत्याही समस्यांवर मात करता यावी यासाठी मी दिवसा बरोबरच रात्री देखील या विद्यार्थ्यांचा समुद्रात पोहोण्याचा सराव घ्यायचो आणि ते त्यात यशस्वी देखील झाले आहेत.
- हिमांशू मलबारी, प्रशिक्षक)

( समोरून येणाऱ्या सागरी लाटा, लागणारे करंट यांचा सामना करत आम्ही अंतर पार करत होतो, त्यातच रात्री पडलेली कडाक्याची थंडी हे सुद्धा आव्हान तेवढेच मोठे होते, पण या सर्वांवर मात करून आज आम्ही हे यश प्राप्त केले आहे, त्याबद्दल समाधान वाटते अशी प्रतिक्रिया या सहाही जलतरणपटू यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना दिली. )
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.