ETV Bharat / sports

Pro Kabaddi League 2021-22 : प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाचा अंतिम सामना 'या' तारखेला होणार

पीकेएलचा अंतिम सामना ( PKL final match ) 25 फेब्रुवारीला होणार आहे. याबाबत आयोजकांनी बुधवारी माहिती दिली आहे.

PKL
PKL
author img

By

Published : Feb 16, 2022, 8:58 PM IST

बंगळुरु : सध्या प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम ( Pro Kabaddi League Season Eight ) खेळला जात आहे. या स्पर्धेबाबत आयोजकांनी बुधवारी महत्वाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाच्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर केली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 25 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाचा अंतिम सामना ( Pro Kabaddi League Final Match ) 25 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. या अगोदर स्पर्धेतील दोन प्लेऑफ सामने 21 आणि 23 फेब्रुवारीला खेळले जाणार आहेत. आयोजकांकडून एक प्रेस रिलीज काढून याबाबत माहिती देण्यात आली आहे. या प्रेस रिलीज मध्ये सांगण्यात आले आहे की, सहा संघ स्पर्धेच्या ट्राफीसाठी लढताना दिसतील.

लीगचे आयुक्त अनुपम गोस्वामी ( PKL Commissioner Anupam Goswami ) म्हणाले, "आम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय लीगचे दररोज आयोजन करू शकलो. ही आमच्यासाठी एक मोठी उपलब्धी आहे. ते पुढे म्हणाले, केवळ कबड्डीच नव्हे तर इतर सर्व इंडोर खेळांना संपर्कात आणण्यासाठी हा एक एक मैलाचा दगड आहे.

सध्या गुणतालिकेत पटना पाइरेट्सचा संघ ( Team of Patna Pirates ) 80 गुणांच्या जोरावर अव्वलस्थानी विराजमान आहे. त्याचबरोबर दबंग दिल्ली 65 गुणांसह दुसऱ्या आणि यूपी योद्धा संघ 63 गुणांनी तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.