ETV Bharat / sports

PM Modi Congratulates Avani & Sriharsha : पंतप्रधान मोदींकडून नेमबाज अवनी आणि श्रीहर्षचे अभिनंदन - श्रीहर्ष देवारेड्डी

नेमबाजीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी अवनी लेखरा आणि श्रीहर्ष देवारेड्डी यांचे अभिनंदन केले आहे. तसेच पंतप्रधानांनी ही कामगिरी 'ऐतिहासिक' असल्याचे म्हटले आहे.

PM modi
PM modi
author img

By

Published : Jun 8, 2022, 4:30 PM IST

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो पॅरालिम्पिक चॅम्पियन अवनी लेखरा हिचे फ्रान्समधील चटियारो येथे पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले ( PM Modi Congratulates Avani and Sriharsha ) आहे. तसेच तिची ही कामगिरी "ऐतिहासिक" असल्याचे म्हटले आहे. नेमबाजीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी श्रीहर्ष देवारेड्डी यांचेही अभिनंदन केले.

लेखराने मंगळवारी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत विश्वचषक स्पर्धेत 250.6 च्या विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले. 2024 च्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी वीस वर्षीय अवनीने 249.6 चा स्वतःचा विश्वविक्रम मोडला ( Avani broke his own world record ). एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, 'ऐतिहासिक कामगिरीसाठी अवनी लेखरा हिचे अभिनंदन. तुम्ही अशाच प्रकारे नवीन उंची गाठत राहा आणि इतरांना प्रेरणा देत राहा. माझ्या शुभेच्छा.

तसेच आणखी एका ट्विटमध्ये मोदी म्हणाले की, "श्रीहर्ष देवरेड्डीच्या सुवर्णपदक जिंकण्याच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. तुमची जिद्द खरोखर प्रेरणा देते. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. देवारेड्डीने 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच2 स्पर्धेत 253.1 गुणांसह सुवर्णपदक जिंकले ( Shriharsh Devareddy won the gold medal ). अवनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये टोकियो पॅरालिम्पिकमध्ये एसएच1 प्रकारात 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. तिने महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन SH1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि पॅरालिम्पिकमध्ये एकापेक्षा जास्त पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.

  • Proud of Sriharsha Devaraddi for wining the Gold. His determination is truly motivating. Best wishes for his future endeavours. https://t.co/z9g42AHng3

    — Narendra Modi (@narendramodi) June 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - New Zealand Cricket : न्यूझीलंड क्रिकेटने राष्ट्रकुल स्पर्धेसाठी नवीन संघाची केली घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.