ETV Bharat / sports

अ‍ॅथलेटिक संघटना आयोजित 'मनोहर पर्रिकर स्मृती राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक' स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद - athletics association

अ‍ॅथलेटिक संघटना आयोजित मनोहर पर्रिकर स्मृती राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दोन दिवसीय स्पर्धेत राज्यभरातील १०२ शैक्षणिक संस्थांच्या १७९२ खेळाडूंनी, विविध वयोगटातील ९ प्रकारच्या स्पर्धांत सहभाग घेतला होता.

अ‍ॅथलेटिक संघटना आयोजित 'मनोहर पर्रिकर स्मृती राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक' स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
author img

By

Published : Aug 19, 2019, 3:01 PM IST

पणजी (गोवा) - अ‍ॅथलेटिक संघटना आयोजित, 'मनोहर पर्रिकर स्मृती राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक' स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दोन दिवसीय स्पर्धेत राज्यभरातील १०२ शैक्षणिक संस्थांच्या १७९२ खेळाडूंनी, विविध वयोगटातील ९ प्रकारच्या स्पर्धांत सहभाग घेतला होता. स्पर्धेत जोशुआ डिसिल्वा मुलांमध्ये तर मरुष्का मडकईकर मुलींमधून सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलेटिक ठरले.

अ‍ॅथलेटिक संघटना आयोजित 'मनोहर पर्रिकर स्मृती राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक' स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

विजेत्यांची घोषणा टीजेएसबी बँकेचे प्रादेशिक प्रमुख अरुण भट यांनी केली. पुरुष गटात साई आरसीसी पेडे विजेता तर आरसीसी बांबोळी उपविजेता ठरले. महिला गटात साई आरसीसी पेडे विजेता तर आरसीसी फातोर्डा उपविजेता ठरले. ब्लूम्स इंटरनँशनल स्कूल उत्कृष्ट मार्च पास्टचे मानकरी ठरले. साई आरसीसी पेडे सर्वसाधारण विजेता आरसीसी फातोर्डा उपविजेता ठरले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी भट यांच्यासह संघटनेचे सचिव परेश कामत, उपाध्यक्ष राजसिंह राणे, संजय भोबे आणि अखिल पर्रिकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. गोव्यात लवकरच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा होणार असल्याने, या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांच्या कामगिरीचा विचार होणार आहे.

Intro:पणजी : गोवा अँथलेटिक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या मनोहर पर्रीकर स्मृती राज्यस्तरीय अँथलेटिक्स स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दोन दिवसीय स्पर्धेत राज्यभरातील 102 शैक्षणिक संस्थांच्या 1792 खेळाडूंनी विविध वयोगटातील 9 प्रकारच्या स्पर्धांत सहभाग घेतला होता. जोशुआ डिसिल्वा मुलांमध्ये तर मरुष्का मडकईकर मुलींमधून सर्वोत्कृष्ट अँथलीट ठरले.

Body:या स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा टीजेएसबी बँकेचे प्रादेशिक प्रमुख अरुण भट यांनी विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. पुरुष गटात साई आरसीसी पेडे विजेता तर आरसीसी बांबोळी उपविजेता ठरले. महिला गटात साई आरसीसी पेडे विजेता तर आरसीसी फातोर्डा उपविजेता ठरले. ब्लूम्स इंटरनँशनल स्कूल उत्कृष्ट मार्च पास्टचे मानकरी ठरले. साई आरसीसी पेडे सर्वसाधारण विजेता आरसीसी फातोर्डा उपविजेता ठरले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी भट यांच्यासह असोसिएशनचे सचिव परेश कामत, उपाध्यक्ष राजसिंह राणे, संजय भोबे आणि अखिल पर्रीकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.
गोव्यात लवकरच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा होणार असल्याने या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांच्या कामगिरीचा विचार होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.